Amruta Khanvilkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: 'लावणी श्रृंगार व प्रेरणादायी'; अमृता खानविलकरने गणेशोत्सवात लावणी आयोजकांचे टोचले कान!

अमृता खानविलकरने लावणी या सांस्कृतिक कलेला बोल लावणाऱ्यांवर टिका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्ताने(Ganesh Chaturthi 2022) अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवा निमित्ताने अनेक मंडळ वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करत आहेत. अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन बीडमधील परळीतील नाथ प्रतिष्ठानने केले होते. या प्रतिष्ठानने लावणी स्पर्धांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणारी 'चंद्रमुखी' म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) उपस्थित होती. त्यावेळी प्रेक्षकांनी तिच्या लावणीचाही आस्वाद घेतला. परंतु, अमृताने लावणी या सांस्कृतिक कलेला बोल लावणाऱ्यांवर टिका केली आहे.

लावणी ही महाराष्ट्राची कलासंस्कृती आहे, या संस्कृतीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहिले जाते. अमृता खानविलकरने नाथ प्रतिष्ठानच्या लावणी महोत्सवामध्ये आपले मत व्यक्त केले आहे. लावणीला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू नका. लावणी श्रृंगार व प्रेरणादायी आहे. लावणीचे जास्त कार्यक्रम कोणीही आयोजित करीत नाही. लावणी विषयी अनेक वाईट विचार लोकांच्या मनात आजही आहेत. पण लावणीला गालबोट लावू नये असं आवाहन अमृताने या कार्यक्रमात केले आहे.

गणेशोत्सवात अमृता खानविलकरच्या लावणीचे आयोजन केल्याने नाथ प्रतिष्ठानाला ट्रोल करण्यात आले होते. याबाबत अभिनेत्री अमृता खानविलकर हिने प्रतिक्रिया दिली आहे. 'अनेक माध्यमातून लावणीला गालबोट लागत आहे, याचे खूप वाईट वाटते. मी सांगू इच्छिते की लावणी महाराष्ट्राची ओळख आहे. आज लावणी जगभरात प्रसिद्ध आहे. कुठेही लावणीला वेगळ्या नजरेने, खालच्या नजरेने बघणं हे मला पाप वाटते. लावणीचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. माझी माध्यमांना विनंती आहे की, तुमच्या काही व्ह्यूजसाठी लावणीला वाईट ठरवू नका. लावणी श्रृंगारिक असली तरी ती स्पिरिच्युअलदेखील आहे. श्रृंगार हा एखाद्या स्त्रीने कसा सादर करावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे लावणी. कलाकार म्हणून मी विनंती करते, एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम कुणी करत नाही, जर कुणी करत असेल तर त्याला गालबोट लावू नका.'

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या लाइव्ह परफॉर्मन्सचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे विविध व्हिडिओ शेअर केले आहेत. आमदार धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानने गणेशोत्सवा निमित्त परळीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी लावणी, भीमगीते, कव्वाली अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT