Amitabh Bachchan Reaction On Bike Ride Instagram
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Reaction On Bike Ride: बिग बींनी अखेर हेल्मेट न घालण्याच सांगितलं कारण; म्हणाले...

बिग बींनी दुचाकीवर बसत हेल्मेट न घातल्याने त्यांच्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यावर खुद्द बिग बींनीच त्यांच्या ब्लॉग साईडवरून प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Amitabh Bachchan Reaction: बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोमवारी सकाळी मुंबईतील रस्त्यावर होत असलेल्या, वाहतूक कोंडीवर एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी थेट एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवर बसत शूटिंग स्पॉट गाठल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. बिग बींनी दुचाकीवर मागे बसलेला फोटो शेअर केला आणि नेटकऱ्यांनी त्यांच्यावर ट्रोलिंग सुरू केली. बिग बींनी दुचाकीवर बसत हेल्मेट न घातल्याने त्यांच्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यावर खुद्द बिग बींनीच त्यांच्या ब्लॉग साईडवरून प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणतात, “एका अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही दुचाकीचा प्रवास कसा काय करू शकतात? ना सुरक्षा?, तुमच्यावर अनेक चाहते मनभरून प्रेम करतात. ते आपली काळजी देखील घेतात. आणि मग नो हेल्मेट? ” त्यानंतर बिग बींनी त्या फोटोच्या मागील सत्यता चाहत्यांना सांगितली.

त्यांनी सांगितले की, मुंबईच्या रस्त्यावर ऑन लॉकेशन शूटिंगच्या दरम्यानचा फोटो आहे. रविवार असल्याने रस्त्यावर शुक- शुकाट होता. मुंबईतील बालार्ड इस्टेट या परिसरातील रस्त्यावर आम्ही शूटिंगची परवानगी घेतली होती. कारण की, रविवारी त्या रस्त्यावरील अनेक ऑफिसेस बंद असतात आणि वाहतूक कोंडीसुद्धा नसल्याने आम्ही तिथे शूटिंग केली. मुख्य बाब म्हणजे, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आम्ही एक रोड बंद करण्याची पोलिसांंनी कारवाई देखील केली होती.

म्हणून इतकी खबरदारी घेत आम्ही त्या रस्त्यावर शूटिंग केली. सोबत आणखी एक, मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मागे गाडीवर बसलो नव्हतो, ती व्यक्ती चित्रपटाच्या शूटिंग मधील कास्ट अँड क्रु मधील होती. त्याच्या गाडीवर बसून मी सर्वांना सहज मी प्रवास करत होतो. मी त्यावेळी एका चित्रपटातील एक सीन शूट करत होतो, त्यामुळे मी कुठेही जात नव्हतो. पण मी सहज वाहतूक कोंडीला त्रासल्यामुळे आणि वेळेची बचत करायची असल्यामुळे ही खास सफर केली.

मुंबईतल्या वाहतूक कोंडीला सामान्य नागरिकांप्रमाणे सेलिब्रिटीही कंटाळल्याने आपल्या अलिशान गाडीचा वापर टाळतात. अशा वेळी सेलिब्रिटी थेट पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत आपले शूटिंग स्पॉट गाठतात. यापूर्वी एकदा सारा अली खानने मेट्रोने, खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी मेट्रो आणि रिक्षाने तर अनन्या पांडेनी देखील मुंबई लोकलने प्रवास केला होता. त्यानंतर आता बिग बींनी आणि अनुष्का शर्माने केल्याने पुन्हा एकदा मुंबईच्या ट्राफिकचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT