Amitabh Bachchan Meets Messi, Ronaldo Instagram @instantbollywood
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Meets Messi, Ronaldo: मेस्सी-रोनाल्डोच्या भेटीसाठी बिग बी बच्चन उतरले फुटबॉल मैदानात

अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची भेट घेतली.

Pooja Dange

Amitabh Bachchan Meets Messi and Ronaldo: बिग बी अमिताभ बच्चन यांना खेळाची आवड आहे हे आपल्याला माहित आहे. अनेकदा आपण त्यांना खेळाडूंचे कौतुक करताना पहिले आहे. यावेळी बिग बी चक्क फुटबॉल मैदानावर उतरले आहेत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची भेट घेतली.

ब्राझीलचा रोनाल्डो आणि पॅरिस सेंट जर्मेन (PNG)चा लिओनेल मेस्सी आमनेसामने होते. निमित्त होते फ्रेंच क्लब पीएसजी आणि अल-नसर आणि अल हिलाल या दोन सौदी अरेबियाच्या क्लबमधून तयार झालेला संघातील फुटबॉल सामन्यांचा. यादरम्यान अमिताभ बच्चनही कार्यक्रमात दिसले. हा सामना पाहण्यासाठी त्यांना सौदी अरेबियात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.

बिग-बीने ब्राझीलच्या नेमार जूनियर आणि तरुण फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे यांच्याशी हात मिळवला. यानंतर त्यांनी लिओनेल मेस्सीची देखील भेट घेतली. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन मेस्सीशी हस्तांदोलन केल्यानंतर काही सेकंद बोलल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

बिग बी अमिताभ बच्चन मेस्सीचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन करत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या महिन्यात कतार येथे खेळल्या गेलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या जेतेपदाच्या लढतीत मेस्सीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT