AMITABH BACHCHAN JALSA ATTACK PLOT saam tv
मनोरंजन बातम्या

मुंबईतील 'जलसा'वर गोळीबाराचा कट बिग बी कुणाच्या निशाण्यावर? Bollywood पुन्हा हादरलं

Goldy Dhillon Threatens Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घरावर हल्ल्याचा कट उधळून लावलाय. मात्र बिग बी कुणाच्या निशाण्यावर आहेत? कोण उठलंय अमिताभ बच्चन यांच्या जीवावर? कशामुळे बिग बींच्या जीवाला धोका आहे? पाहूयात हा रिपोर्ट...

Suprim Maskar

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लोंकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली... दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबई आणि दिल्लीतून दोन शार्पशूटरना अटक केल्यानंतर बच्चन यांच्या 'जलसा' निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा मोठा कट उघडकीस आलाय...तसचं या संपूर्ण प्रकरणामागे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई आणि परदेशी हँड्लर्सचा हात असल्याचेही समोर आलयं... मात्र आरोपींच्या चौकशीतून हल्ल्यामागील काय कारण समोर आले...पाहूयात...

अमिताभ बच्चन यांच्या जलसावर गोळीबाराचा कट रचणाऱ्या आरोपी विकास ठाकूरला दिल्लीतून तर आरोपी दीपक सिंग याला मुंबईतून अटक केली

दीपक सिंगला मुंबईत राहून बच्चन यांच्या घराबाहेर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती

1984 मधील शीखविरोधी दंगलींसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी कथितरित्या केलेल्या वक्तव्यांचा राग धरून अमिताभ बच्चन यांच्या घरावर गोळीबाराचा कट

या संपूर्ण कटामागे कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोई आणि परदेशात बसलेल्या गँगस्टरचे जाळे असल्याचे तपासात समोर

अटक करण्यात आलेला आरोपी विकास ठाकूर हा अनमोल बिष्णोईला शस्त्र पुरवायचा.

पैशांच्या मोबदल्यात वेगवेगळ्या टोळ्यांसाठी काम करणारा विकास परदेशात वास्तव्यास असलेल्या फरार गँगस्टरच्या संपर्कात असल्याची माहिती

दुसरीकडे, या अटकेनंतर गँगस्टर गोल्डी ढिल्लों याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोन्ही आरोपींना कोणत्याही गँगशी जोडू नये असे त्याने म्हटलयं... तसचं मुंबईत आमचे आणखी 200 शूटर तयार असल्याचा दावा करत ढिल्लोंनं बच्चन पिता-पुत्रांना थेट जीवे मारण्याची धमकी दिलीय.... अमिताभ बच्चन यांनी कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केले तरी त्यांच्यावर हल्ला करणार," असा धमकीवजा उल्लेख त्याने मेलमध्ये केलाय...मात्र हा गोल्डी ढिल्लो कोण आहे? पाहूयात...

कोण आहे गोल्डी ढिल्लो

पंजाबमधील कुख्यात गँगस्टर

लॉरेंस बिश्नोई-गोल्डी ब्रार गँगचा महत्त्वाचा सदस्य

जानेवारी 2024 मधील चंदीगड गोळीबार प्रकरणातील आरोपी

NIAने त्याच्यावर 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय

दरम्यान टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आता बिग बींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.. त्यात अमिताभ बच्चन यांनीही याप्रकरणी बच गए असं लिहून X पोस्ट केलीय... तर दुसरीकडे बिग बींच्या घरावर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी विकास ठाकूर याला अटक केल्यानंतर विकासचा संबंध अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचाही कसून तपास यंत्रणांकडून सुरु आहे....आता दिल्ली आणि मुंबई पोलीस या प्रकरणाच्या खोलात शिरून सोशल मीडियावरील धमक्यांची सत्यता पडताळणार का? बिग बींच्या घरावर हल्ल्याचा कट रचणारा खरा मास्टरमाईंड कोण आहे? कुणाच्या निशाण्यावर बिग बी आहेत? याचा शोध पोलिस घेणार का? हा खरा प्रश्न आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire: 50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग

अमित शाहांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा; ओमराजे निंबाळकर केंद्रात मंत्री होणार? 45 मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय हालचालींना वेग, आघाडीचा चेंडू प्रियंकांच्या कोर्टात, पक्षप्रमुखांशी चर्चा करणार

'गिरीश महाजन संकटमोचक आहे, पण लय लफडेबाज माणूस'; गुलाबराव पाटलांचं विधान

Maharashtra News Live Update: जुहू कोळीवाडा स्मशानभूमीजवळ व्हीबीएसएल साइटवर क्रेन कोसळली

SCROLL FOR NEXT