big b news Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना अपघात; KBC च्या सेटवर घडली घटना

दिवाळीच्या आदल्या दिवशी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर अपघात घडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amitabh Bacchan: दिवाळीच्या आदल्या दिवशी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर अपघात घडला आहे. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचे कळत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर या अपघाताची माहिती शेअर करत पायातून होत असलेला रक्तस्त्राव थांबण्यासाठी काही टाकेही लावण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते खूप चिंतेत आले असून प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहे.

रविवारी 'कौन बनेगा करोडपती' च्या सेटवर शूटिंग करताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात त्यांच्या पायाला इजा झाली असून पायाला दुखापत झाली आहे. पायातून खुपच रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ही माहिती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.

त्या ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले की, "धातुच्या धारदार तुकड्याने त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने इजा झाली आहे. नस कापल्याने पायतून रक्तस्त्राव थांबत नव्हते. त्यावेळी लगेचच सेटवरील कर्मचारी आणि तेथील डॉक्टरांच्या टीमच्या मदतीमुळे जास्त अनर्थ घडला नाही. सध्या तरी पायाला टाके पडले असून लवकरच बरा होऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहेत."

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात वाहन चालकाचा अजब प्रकार, चारचाकी वाहन चालकाची थेट डिव्हायडरला धडक

Cheese paratha recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता हा चीज पराठा; झटपट तयार होणार पदार्थ मुलांनाही आवडेल

Ashok Kharat: भोंदू खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय, कोर्टाकडूनही ग्रीन सिग्नल

Ramayana Teaser: हनुमान जयंतीला आला 'रामायण'चा टिझर, रणबीर कपूर बनला 'पुरुषोत्तम राम'; नेटकरी एका सुरात म्हणाले शानदार!

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹४६००० होण्याची शक्यता; पगार ३४ टक्क्यांनी वाढणार

SCROLL FOR NEXT