Ambat Shoukin Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ambat Shoukin: मनोरंजनाचा डोस घेऊन येत आहे 'आंबट शौकीन'; उलगडणार तीन मित्रांची अतरंगी कहाणी

Ambat Shoukin Marathi Movie: 'आंबट शौकीन' या आगामी मराठी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे व किरण गायकवाड या तीन मित्रांची अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Ambat Shoukin Marathi Movie: हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे व किरण गायकवाड या तीन मित्रांची अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या चौघांसोबत या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “‘आंबट शौकीन’ ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या तीन मित्रांची गंमतीशीर सफर या सिनेमातून दाखवली आहे. हा चित्रपट हास्य, विनोदने प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. तसेच चित्रपटाला लाभलेल्या उत्तम कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’

चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India Plane Fire: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात; लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाला आग

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे नापणे धबधब्यावर लोकार्पण

Nanded News: स्मशानभूमीच्या वादावरून दोन गावचे गावकरी भिडले, अंत्ययात्राच थांबवली|VIDEO

Coriander Benefits: हाय बीपी आणि डायबिटीजसाठी वरदान ठरेल तुमच्या किचनमधील 'ही' एक गोष्ट

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा राडा; शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT