Allu Arjun Watch Adipurush With Daughter Araha Saam TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun Enjoyed Adipurush: 'मैं रुकेगा नहीं... पुष्पा फेम अल्लू अर्जुनला कसा वाटला 'आदिपुरूष'? लेकीसोबत थेट गाठलं होतं थिएटर

Allu Arjun Watch Adipurush With Daughter Araha: अजूनही सर्वांचा लाडका असलेला अल्लू अर्जुन यानं आदिपुरूष चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला.

Pooja Dange

Allu Arjun Watch Adipurush Movie : दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता प्रभासचा 'आदिपुरूष' हा चित्रपट सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. पण दुसरीकडे याच चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकेकाळी बॉक्स ऑफिस गाजवलेला पुष्पा या चित्रपटाच्या नायकाने अर्थात अल्लू अर्जुननं हा चित्रपटही आवर्जुन बघितला. यावेळी त्याच्यासोबत लेक अरहा देखील सोबत होती.

झुकेगा नहीं साला म्हणत एकेकाळी चित्रपटाचा पडदा व्यापून टाकणारा पुष्पा अर्थात अजूनही सर्वांचा लाडका असलेला अल्लू अर्जुन यानं आदिपुरूष चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला. यावेळी त्याच्यासोबत लेक अराहा देखील होती.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'आदिपुरूष' १६ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड आशा होती. त्यांची उत्सुकता कमालीची ताणली होती. पण थिएटरमध्ये जाणाऱ्या बहुतेकांची निराशा झाली आहे, असा रिव्ह्यू सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे.

पण दुसरीकडे, या चित्रपटाला प्रतिसादही मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. एकीकडे टीका होत असताना दुसरीकडे कौतुकही होत आहे. चित्रपटावरून संमिश्र प्रतिक्रिया असतानाच अल्लू अर्जुन आणि त्याची लेक थेट थिएटरमध्येच पोहोचली.

व्हिडिओ व्हायरल

आदिपुरूष चित्रपटाला अनेक कलाकरांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवला आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून अनेक कलाकारांनी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांत हजेरी लावली. 'पुष्पा' फेम सुपरस्टार अल्लू अर्जुनने मुलगी अरहासोबत चित्रपटगृहात 'आदिपुरूष'चा बघितला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अल्लू अर्जुन सध्या त्याचा नवीन चित्रपट 'एएए'मुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनने मुलगी अरहा आणि एएए चित्रपटाचे दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवाससोबत चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली. अल्लू अर्जुननंतर सुपरस्टार मोहनलाल यांनीही चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली. रिपोर्टनुसार मोहनलाल हे देखील रणबीर कपूर, राम चरणनंतर १०००० तिकीटे अनाथ मुले आणि मजुरांना देणार आहेत, असे समजते. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' चित्रपटात प्रभास रामाच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सेननने सीतेची भूमिका निभावली आहे. सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात देवदत्त नागे, सनी सिंग ही स्टारकास्टही आहे. आदिपुरूष चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्ल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वयंपाक करताना 'या' भाज्यांमध्ये जिऱ्याचा वापर करू नका!

Maharashtra: पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही; महायुतीने 80% जागा जिंकून रचला इतिहास

Winter Hair Care: हिवाळ्यात केसातील कोड्यावर उपाय; वापरा 'हे' तेल, केसं होतील घनदाट

Diabetes : मधुमेह राहील नियंत्रणात फक्त नियमित खा 'ही ' चटणी

उबाठाचे पाच आमदार संपर्कात, 2-3 सोडता सर्व आमच्याकडे येणार; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT