Pushpa 2 ANI
मनोरंजन बातम्या

Pushpa 2' New Update: अयो बाबो! अल्लू-अर्जुनच्या ‘पुष्पा २’ मधील एका सीनसाठी तब्बल ५० कोटींचा खर्च

Pushpa 2 : दक्षिणेतील चित्रपटसृष्टीने एकापाठोपाठ एक दमदार चित्रपटाची निर्मिती होत आहे. यात काही चित्रपटाचे सिक्वेल आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या यादीत पहिले नाव अल्लू अर्जुन 'पुष्पा २'चे आहे. चा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Bharat Jadhav

Pushpa 2' New Update Shooting :

अल्लू अर्जुन या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे 'पुष्पा: द रुल' या पिक्चरचा सिक्वेल १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला जगभरातून अप्रतिम प्रतिसाद मिळाला. आता सध्या चित्रपटच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग चालू आहे. आता या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आलीय. एका कार्यक्रमात या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.(Latest News)

पुष्पा-२ चित्रपट सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटातील एका सीनसाठी तब्बल ५० कोटी रुपये खर्चण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हा सीन पार्ट २ मधील सर्वात महत्त्वाचा सीन असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपटाच्या या सीक्वेन्सवर ५० कोटी खर्च

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाचे (Movie) दिग्दर्शन सुकुमार करत आहे. त्याने प्रत्येक दृश्य आणि कथेचे नियोजन केलंय. याचदरम्यान दुसऱ्या पार्टच्या कथेचा खुलासाही झालाय. Cinejosh डॉट कॉम या चित्रपटाच्या सीनविषयी माहिती दिलीय. त्यानुसार ‘पुष्पा २’ मध्ये ‘गंगाम्मा तल्ली जथारा’ मधील एक सीन समाविष्ट करण्यात आलाय.

हा सीन चित्रपटाच्या इंटरव्हलपूर्वी दाखवला जाईल. हा कथेचा एक महत्त्वाचा भाग असून हा सीन सुमारे ३० मिनिटे चालणार आहे. हा सीक्वेन्स शूट करण्यासाठी ३५ दिवसांहून अधिकचा वेळ लागलाय. याच सीक्वेन्सवर ५० कोटींहून अधिक खर्च झाल्याचे सांगितलं जात आहे. तसेच या सिक्वेलमधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक तिरुपती गंगाम्मा जटारा यांच्यापासून प्रेरित असल्याचं सांगितलं जात आहे.

‘पुष्पा २’मध्ये हा सीक्वेन्स खूप महत्त्वाचा असणार आहे. या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या ३० मिनिटांच्या सीक्वेन्समध्ये एक गाणे, एक फाईट सीन आणि एक इमोशनल सीन असल्याचेही सांगितले जातंय. या सीक्वेन्सनंतर कथेला एक महत्त्वाचे वळण मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अल्लू अर्जुनला या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT