Allahabad Court Slam Adipurush Makers  Instagram@actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush Court Case : धर्मग्रंथांचा तरी आदर करा ... हायकोर्टाने आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही सुनावले

Adipurush Makers : प्रभास आणि क्रिती सेननच्या 'आदिपुरुष'वर प्रेक्षकांनी घेतलेला आक्षेप आहे.

Pooja Dange

Adipurush Controversy : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत. या 10 दिवसांत या चित्रपटावरून बरेच वाद झाले आहेत. प्रेक्षक आणि नेते-अभिनेते या चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका करत होते. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही यावर निर्मात्यांना सुनावले आहे.

चित्रपटाचे संवाद बदलून सत्य झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण चित्रपटात दाखविण्यात आलेल्या गोष्टींवर इच्छा असूनही दुर्लक्ष करता येत नाही. यामुळे चित्रपटाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणी झाली आहे.

प्रभास आणि क्रिती सेननच्या 'आदिपुरुष'वर प्रेक्षकांनी घेतलेला आक्षेप आहे. वकील कुलदीप तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याविरोधात याचिका दाखल केली होती.

सोमवारी, 26 जून रोजी न्यायालयाने यावर सुनावणी करत चित्रपट निर्मात्यांना फटकारले आहे. न्यायालयात काय घडले याची माहिती देत ​​कुलदीप तिवारी यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'न्यायमूर्ती राजेश चौहान आणि न्यायमूर्ती श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी केली. आदिपुरुष या आक्षेपार्ह चित्रपटासाठी त्यांनी निर्मात्यांना तसेच सेन्सॉर बोर्डाला फटकारले आहे.

'आज तक'च्या वृत्तानुसार, 'वरिष्ठ वकील रंजना अग्निहोत्री यांनी चित्रपटाशी संबंधित काही तथ्ये न्यायालयात मांडली जी आक्षेपार्ह होती. यावेळी न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाच्यावतीने उपस्थित असलेले वकील अश्विनी कुमार यांना विचारले की, सेन्सॉर बोर्ड काय करत आहे ? तो समाजाचा आरसा आहे. या चित्रपटातून येणार्‍या पिढीला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहात, सेन्सॉर बोर्डाने त्यांची जबाबदारी कळत आहेत की नाही ?

वृत्तानुसार, न्यायालयाने रामायण, कुराण, गुरु ग्रंथसाहिब आणि गीता या धार्मिक ग्रंथांना वाचवण्यास सांगितले आहे. यासोबतच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व अन्य संबंधित व्यक्ती न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी रंजना अग्निहोत्री यांनीही सेन्सॉर बोर्डाने अद्याप कोणतेही उत्तर दाखल न केल्याबद्दल आक्षेप घेतला. आता या प्रकरणावर 27 जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अजित पवार उद्या नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

VIDEO : टिंगरेंनी शरद पवारांसह काँग्रेस, शिवसेनेला कोर्टात ओढलं

Sangli Politics: सांगलीत मोठी राजकीय घडामोड, ठाकरेंच्या युवासेनेचा भाजपला पाठिंबा

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; २४ तास घेता येणार दर्शन

Surya Gochar 2024: सूर्याचं नक्षत्र गोचर 'या' राशींच्या जीवनात आणणार वादळ; आर्थिक अपयशही येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT