Alia Bhatt's grandfather Passed Away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt's grandfather Passed Away: आलियावर कोसळला दु:खाचा डोंगर, झाले जवळच्या व्यक्तीचे निधन..

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट व तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Chetan Bodke

Alia Bhatt's grandfather Passed Away Age Of 95: बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या कुटुंबींयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आलियाचे आजोबा आणि आई सोनी राजदानचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचे गुरूवारी निधन झाले आहे. आलिया भट्टचे आजोबा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. फुफ्फुसासंबंधित आजार असल्याने त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. नरेंद्रनाथ हे आलियाची आई सोनी राजदान यांचे वडील होते.

वडिलांच्या निधनाची बातमी, सोनी राजदानने सोशल मीडियावरून शेअर केली आहे. ते ९३ वर्षांचे होते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे, ज्यावर चाहते आणि मित्र शोक व्यक्त करत आहेत. आलिया आपला जास्तीत जास्त वेळ तिच्या आजोबांसोबत घालवायची. त्यामुळेच तर ती त्यांच्यासाठी कान्स फेस्टिव्हल अर्धवट टाकून आली होती. आलियानं आजोबांना श्रद्धांजली अर्पण करत सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली. (Entertainment News)

राजदान यांना गेल्या आठवड्यात मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. आलियानं आजोबांच्या ९२ व्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओत नरेंद्र राजदान ९२ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्यावेळी रणबीर कपूर देखील होता. तर आलिया आजोबांना मागनं चियर करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आलिया म्हणते, “माझे आजोबा,माझे हिरो. वयाच्या ९३ पर्यंत गोल्फ खेळले, काम केलं आणि सगळ्यात चांगलं ऑम्लेट बनवलं, खूप चांगल्या कथा ऐकवल्या, व्हायोलिन वाजवलं आणि आपल्या पणतीसोबतही खेळले.” (Bollywood News)

आलियानं पुढे म्हणाली.. आज दुःखानं मन भरलं आहे पण तितकाच आनंदही आहे मनात. कारण माझ्या आजोबांनी जे काही आयुष्यात केलं त्यानं मला नेहमीच आनंद दिला आहे. मला आनंद आहे मी माझ्या आजोबांच्या सान्निध्यात वाढलेय. आलियाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. करण जोहरनं देखील आलियाच्या पोस्टवर कमेंट इमोजी पोस्ट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT