Taimoor Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Taimur: तैमूरला लाडक्या बहिणीकडून गिफ्ट, गिफ्ट पाहता 'आनंद गगनात मावेना'

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा लेक तैमूर आज ६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Chetan Bodke

Happy Birthday Taimur: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा लेक तैमूर आज ६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तैमूरच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कपूर आणि खान कुटुंबाने त्याच्यासाठी खास भेटवस्तूही पाठवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तैमूरला त्याची धाकटी बहीण राहा कपूरकडून वाढदिवसाची खास भेटही मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खास भेटवस्तू आलियाने तिच्या लेकीकडून तैमूरच्या वाढदिवशी एक कस्टमाईज्ड मार्वल सुपरहिरो गिफ्ट दिले आहे. तैमूर देखील मार्वल सुपरहिरोचा चाहता आहे, तैमूरला वाढदिवसानिमित्त गिफ्ट मिळाल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

दरम्यान, करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात ती म्हणते, "तैमूर, मी तुझ्यावर खुप प्रेम करते. तु मोठ-मोठी स्वप्न पाहत राहा. सूर्यास्ताचा पाठलाग करत राहा आणि प्रत्येक गोष्टीत काही तरी नवं शोधत राहा...

आणि अर्थातच धम्माल, मस्ती करत तुझ्या स्वतःचे गाणे बनव, तुझी गिटार वाजवत नव- नवे गाणे बनव. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा… #माय टिम टिम #मेरा बेटा #Happy birthday टिम." यावेळी बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

करीना कपूर खानने नुकतेच एका इंटिमेट बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते, ज्याची थीम होती मार्वल सुपरहिरो. तैमूर सर्वात गोंडस आणि लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. दुसरीकडे, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा कपूरच्या आगमनानंतर, चिमुकल्या राहाचीही झलक पाहण्यासाठी चाहत्यांना फारच उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT