Alia Bhatt Instagram @aliaabhatt
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt at Met Gala 2023: आलियाच्या ड्रेसची बात न्यारी.. चक्क एक लाख मोत्यांनी सजलाय आलियाचा ड्रेस, जाणून घ्या

Alia Bhatt Dress At Met Gala: संपूर्ण व्हाईट गाऊनमध्ये आलिया मेट गालाच्या रेड कार्पेटवर दिसली.

Pooja Dange

Alia Bhatt Has 100 K Pearls On Her Dress: मेट गाला या फॅशन जगतातील सर्वात मोठ्या शोचा झगमगाटाला काल रात्री पाहायला मिळाला. अनेक सेलिब्रिटी मेट गालाच्या रेड कार्पेटवर दिसले. या बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश होता. अभिनेत्री आलिया भट पहिल्यांदाच मेट गालाच्या रेड कार्पेटवर अवतरणार होती.

आलियाने तिच्या मेट गाला डेब्यूसाठी विशेष तयारी केली होती. संपूर्ण व्हाईट गाऊनमध्ये आलिया मेट गालाच्या रेड कार्पेटवर दिसली. तिच्या हा गाऊन खूप खास होता. तिच्या या गाऊन एक लाख मोत्यांचे भरतकाम करण्यात आले आहे.

आलिया भटने सोशल पोस्ट करत तिचा संपूर्ण अनुभव शेअर केला आहे. आलियाने पोस्टमध्ये लिहिले आहे, 'मला नेहमीच प्रतिष्ठित चॅनेलच्या नववधूंनी आकर्षित केले आहे. प्रत्येकवेळी कार्ल लेजरफेल्डचे डिझाईन सर्वात नाविन्यपूर्ण आणि विस्मयकारक असून कॉउचरमध्ये चमकली आहे.

आज रात्रीचा माझा लूक यावरून आणि विशेषत: सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या 1992 च्या चॅनेल ब्रायडल लुकपासून प्रेरित झाला आहे.

मला असे काहीतरी करायचे होते जे खरे वाटले. म्हणून मी मोती निवडले. हा संपूर्ण ड्रेस भारतात बनवला असे मी अभिमानाने सांगत आहे. या ड्रेसवर 100,000 मोत्यांनी केलेले भरतकाम @prabalgurung यांनी खूप प्रेमाने केले आहे. माझ्या पहिल्या मेट गालासाठी हा ड्रेस परिधान केल्याचा मला खूप अभिमान आहे.

मुलींकडे कधीच इतके जास्त मोती असू शकत नाहीत… हा लूक अजून सुंदर दिसण्यासाठी योग्य अॅक्सेसरीज हवी होती. त्यासाठी मी केसांवर मोत्यांच्या बोव तयार करून घेतला.' (Latest Entertainment News)

मेट गाला २०२३ मधील आलियाचा गाऊन हा नववधू कलेक्शनमधील होता. हा गाऊन व्हाईट वेडिंगसाठी उत्तम चॉईस असू शकतो. आलियाच्या डिपनेक आणि बॅकलेस गाऊनची शोभा सफेद मोत्यांमुळे अजून वाढली होती. आलियाने तिचा मेकअप अगदी नॅचरल ठेवला होता. तिच्या चेहऱ्यावर नववधूचा ग्लो दिसत आहे. आलियाच्या हातातील ग्लोव्ज आणि बोटातील अंगठ्या विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT