Alia Bhatt Baby Shower saam tv
मनोरंजन बातम्या

आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाला कोण-कोण येणार? हा कार्यक्रम कुठे? पाहुण्यांची यादीच आली समोर

आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात या पाहुण्यांना आंमत्रण

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडचे क्यूट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या प्रेग्नंसीचे दिवस एन्जॉय करते आहे. दरम्यान, लवकरच कपूर कुटुंबात आनंद दरवळणार आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर विशेष नियोजन करत आहेत. आई सोनी राजदान अलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत कपूर कुटुंबात लहान बाळाचे आगमन होणार आहे. याचदरम्यान, बाळाची होणारी आजी त्याच्या स्वागतासाठी खास प्लानिंग करत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंब आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे आलियाच्या डोहाळे जेवणाच्या या कार्यक्रमात केवळ महिलांचा सहभाग असणार आहे.

आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा मुंबईत होणार आहे. मात्र अभिनेत्री आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा तिच्या लग्नाप्रमाणे घरी अथवा बाहेर होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अलीकडेच आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील पाहुण्यांची नावे देखील समोर आली आहेत. माहितीनुसार, शाहीन भट्ट, रणबीरच्या बहिणी करीना कपूर खान, करिश्मा कपूर, आकांक्षा रंजन सिंग, नव्या नंदा, श्वेता बच्चन, आरती शेट्टी यांच्यासह तिच्या बालपणीच्या मैत्रिणी आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ५ दिवसांत १५० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; पाच दिवसात ७८ दारू अड्ड्यांवर छापे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जातून सुटकेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव, हत्या करून कारमध्ये मृतदेह पेटवला

देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

डायबिटीजमध्ये नारळ पाणी पिऊ शकता का? नारळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते की कमी होते? जाणून घ्या

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, आंदोलनापूर्वी ३ प्रवक्त्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT