Alia Bhatt and Ranveer Singh will be the guests of Coffee with Karan Season 7 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 7 : कपूर कुटुंबाविषयी आलिया भट्ट पहिल्यांदाच स्पष्ट बोलली, म्हणाली...

'कॉफी विथ करण सीझन ७'च्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग पाहुणे म्हणून सामील होणार आहेत. शोमध्ये आलियाने तिचा पती रणबीर कपूरच्या घरातील संस्कृतीबद्दल सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : रणवीर सिंग(Ranveer Singh) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) 'कॉफी विथ करण - सीझन ७'(Koffee With Karan 7) च्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. या शोचा पहिला एपिसोड ७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता दाखवला जाणार आहे. शोचा हा सीझन केवळ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. करणच्या शोच्या या नवीन सीझनची सुरुवात रणवीर आणि आलियाच्या मजेदार एपिसोडने होणार आहे. हे दोघं शोमध्ये मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहेत. याची झलक या एपिसोडच्या टीझरमधून पाहायला मिळाली आहे.

'कॉफी विथ करण सीझन ७' मध्ये, करण जोहर आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याशी त्यांच्या नातेसंबंधांबद्दल बोलतो. तिघांचेही हे संभाषण खूपच रंजक आहे. आलियाने शोमध्ये कपूर कुटुंबातील तिचा अनुभव सांगितला आहे.

कपूर कुटुंबातील सदस्य झाल्याबद्दल आपले मत मांडताना आलिया भट्ट म्हणाली, 'मी माझी आई, माझी बहीण आणि माझे वडील यांच्यासोबतच लहानाची मोठी झाले आहे. आमच्यातील संवाद फार मर्यादित होतो. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत, परंतु आमचं मोठं कुटुंब नाही. आम्ही कधीच मोठमोठे उत्सव आणि गेट-टूगेदर साजरे केले नाही. आम्ही सगळे नेहमी आमच्या कामातच व्यग्र असायचो'.

आलिया भट्ट पुढे म्हणाली, 'कपूर कुटुंबात आल्यानंतर मी पाहिले की इथे सर्व जण मिळून सगळ्या गोष्टी करतात. एकत्र जेवण घेतात, एकत्र आरती होते, ही खूप चांगली गोष्ट आहे. मला हळूहळू याची सवय होत आहे.

आलिया भट्टने नुकतेच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आलिया आणि रणबीर लवकरच आई-वडील होणार आहेत. घरातील नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी दोघेही उत्सुक आहेत. आलिया सध्या लंडनमध्ये आहे. ती तिथे तिच्या पहिलाच हॉलिवूड प्रोजेक्ट 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग करत आहे. यामध्ये 'वंडर वुमन' फेम गॅल गॅडोट तिच्यासोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT