Welcome 3 Teaser Saam TV
मनोरंजन बातम्या

Welcome 3 Teaser: अक्षय कुमारने स्वतःसह चाहत्यांना दिले खास गिफ्ट; 'वेलकम 3'चा टीझर केला शेअर

Multistarar Film: 'वेलकम 3'मध्ये अवतरलं संपूर्ण बॉलिवूड.

Pooja Dange

Akshay Kumar Share Welcome 3 Teaser:

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

या नवीन चित्रपटाच्या टीझर अप्रतिम आहे. या टीझरमध्ये आपल्याला अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह परेश रावल दिशा पटनी, जॅकलिन फर्नांडिस, रविना टंडन, लारा दत्ता, अरशद वारसी, संजय दत्त, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आहेत.

हे सगळे स्टार एक गाणं गात आहेत. दरम्यान मधेच आलेल्या सुरेल आवाज ऐकून तुम्हाला धक्का बसेल करा. कारण मिका सिंग आणि दिलेर मेहेंदी 'तुनक तुनक तू' गात आहेत.

अक्षय कुमारने हा टीझर शेअर करत लिहिले आहे की, 'स्वतःला आणि तुम्हा सर्वांना आज एक बर्थडे गिफ्ट दिले आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही थँक्स म्हणा, मी वेलकम ३ म्हणालो का? वेलकम टू द जंगल'

तसेच २० डिसेंबर २०२४ ला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे देखील अक्षय कुमारने सांगितले आहे.

अक्षय कुमार, कतरिना कैफ, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर यांचा वेलकम २००७ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ८ वर्षांनी २०१५ला वेलकम बॅक प्रदर्शित झाला. आता पुन्हा ८ वर्षांनी २०२३ साली वेलकम ३ आपल्या भेटीला येत आहे.

यावेळी या चित्रपटाची थीम जंगल आहे. टीझरमध्ये सगळे कलाकार हातात हत्यार घेऊन आहेत. यावेळी वेलकम ३ बघताना तुफान धमाल येणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये वादाची ठिणगी? कारण आलं समोर

रीलस्टार प्रतिक शिंदेच्या फॉर्च्युनरमुळे भीषण अपघात; तीन गाड्यांना धडक बसली, नेमकं काय घडलं?

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Udid Dal Vada : उडदाच्या डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे? जाणून घ्या रेसिपी

‘Bigg Boss 19’च्या घरातून २ सदस्यांचा पत्ता कट, नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT