Akshay Kumar Selfiee Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Selfiee: अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची चाहत्यांमध्ये चर्चा

अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची तुलना शाहरुख खानच्या 'फॅन'शी होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akshay Kumar-Emraan Hashmi Selfiee Poster Out: २०२३ या वर्षात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे बॉलिवूड रिमेक पाहायला मिळणार आहे. अजय देवगनचा 'भोला' हा चित्रपट 'कैथी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. 'अला वैकुंठपुरमलो' या अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यन दिसणार आहे. तर अक्षय कुमार आणि इमरान हाशमी मल्याळम सुपर हिट चित्रपट 'ड्रायविंग लायसन्स' या चित्रपटाचा रिमेक घेऊन २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'सेल्फी' असे या चित्रपटाचे नाव आहे.

अॅक्शन-ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, इमरान हाशमी डायना पेंटी आणि नुसरत भरुचा दिसणारा आहेत. अक्षय कुमार आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मोशन पोस्टरच्या सुरुवातीला अक्षय कुमार दिसत आहेत. त्यानंतर अक्षय पोस्टर दिसते आणि फॅन्सला थांबवताना पोलीस सुद्धा दिसत आहेत. पोस्टरच्या शेवटी इमरान हाशमी आणि अक्षय कुमार एकमेकांना खुन्नस देताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अक्षय कुमारने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. तसेच त्याने या पोस्टर शेअर करत म्हटले आहे की, 'फॅन्स स्टारला बनवू शकतात. तसेच ते स्टारला खाली सुद्धा खेचू शकतात. पाहा काय घडते जेव्हा एक फॅन त्याच्या आयडियलच्या विरोधात जातो.'

अक्षय कुमारच्या या कॅप्शनवर चाहत्यांच्या खूप भन्नाट कमेंट पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'फॅन चित्रपटाचा रिमेक आहे का भाई.' त्यानंतर आणखी एकाने कमेंट केली आहे, 'मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायसन्सचा रिमेक आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे, 'अरे देवा, दुसरा रिमेक.' 'जेव्हा सांगितलं हेरा फेरी 3 करा हिट होईल... तेव्हा यांना पैसे कमवायचे होते...' तर एका चाहत्याने अक्षय कुमारला सल्ला दिला की, 'अक्षय सर, तुमच्याकडे खूप वेळ आहे, या चित्रपटात चांगला रोल करा, प्लिज सर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

Tiramisu Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरच्या घरी झटपट बनवा इटालियन डेजर्ट तिरामिसू, वाचा सोपी रेसिपी

उष्माघातामुळे 7 जणांचा बळी, महाराष्ट्राने गाठला तापमानाचा नवा उच्चांक

Tuesday Horoscope: कामातले वाद मिटतील, ५ राशींवर गणपती बाप्पा होणार प्रसन्न, हाती येईल अचानक पैसा

SCROLL FOR NEXT