Akshay Kumar donates Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar donation : 'येक नंबर'! त्या एका कृतीनं अक्षय कुमारनं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मने

Akshay Kumar donates Rs 1 crore : अभिनेता अक्षय कुमारनं अयोध्येतील माकडांसाठी १ कोटी रुपये दान केले आहेत. याच मदतीतून तेथील माकडांना रोजचं अन्न दिलं जाणार आहे.

Saam Tv

भगवान श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हजारो-लाखो दिव्यांची रोषणाई केली जाते. अयोध्येत मोठा उत्सव असतो. या उत्सवात आणखी रंग भरलाय तो बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं. अक्षय कुमार यानं अयोध्येतील माकडांना दररोज दिल्या जाणाऱ्या अन्नासाठी एक कोटी रुपये दान केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, भगवान श्रीरामांचा आशीर्वाद आणि भारतीय संस्कृती आणि पुराणातील कथांमध्ये महत्व असलेल्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी अक्षय कुमारने हे पाऊल उचललं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत माकडांना दररोजचे अन्न अंजनेया सेवा ट्रस्टकडून दिले जाते. त्याच ट्रस्टचे प्रमुख जगतगुरू स्वामी राघवाचार्यजी महाराजांनी अक्षय कुमारला (Akshay Kumar) याबाबत आवाहन केले होते. त्यावर अक्षय कुमारने तातडीने होकार दिला.

आई-वडील आणि सासऱ्यांच्या नावे दान

ट्रस्टच्या एका सदस्यानं सांगितलं की, अक्षय कुमार त्याचे आई -वडील हरिओम आणि अरुणा भाटिया आणि सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजकार्यासाठी दान करत असतो. अक्षय केवळ दानशूरच नाही, तर, सामाजिक कार्यातही त्याचा सक्रिय सहभाग असतो. अक्षयला अयोध्या शहर आणि तेथील नागरिकांप्रती खूपच प्रेम आहे. माकडांना खाऊ घालताना तेथील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि खाऊ दिल्यानंतर आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जाईल, याची काळजी घेण्यात येईल, असेही सदस्याने सांगितले.

अक्षय कुमार सध्या काय करतो?

अक्षय कुमार सर्वात व्यग्र असा कलाकार आहे. एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा 'खिलाडी' अशीही त्याची ओळख आहे. वेलकम टू जंगल, हेरा फेरी ३, हाउसफुल ५, जॉली एलएलबी ३ या आगामी चित्रपटांत तो वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करताना पाहायला मिळणार आहे. तसेच यंदाच्या दिवाळीत तो रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT