Akshay Kumar World Record Instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Selfie Record: अक्षय कुमार रचला नवीन रेकॉर्ड; तीन मिनिटात काढले सर्वाधिक सेल्फी

Selfie Guinness World Record: अभिनेता अक्षय कुमारने रचला विश्वविक्रम.

Pooja Dange

Akshay Kumar Created Guinness World Record: अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'सेल्फी' हा त्याचा आगामी चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अक्षय वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. अक्षय कुमारने तीन मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेऊन नवीन विक्रम केला आहे.

अक्षयने काल म्हणजे २२ फेब्रुवारी २०२३ला मुंबईमध्ये फॅन मीट अँड ग्रीट इव्हेंटमध्ये सर्वाधिक सेल्फी काढण्याच इतिहास रचला आहे. याची माहिती अक्षयने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकॉउंटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून दिली आहे.

अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. काय म्हणाला अक्षय पाहूया, मी जे काही मिळवले आहे आणि मी आयुष्यात जिथे आहे ते माझ्या चाहत्यांच्या बिनशर्त प्रेमामुळे आहे.

माझ्या संपूर्ण कारकिर्दीत ते माझ्या पाठीशी उभे राहिले, 'त्या सर्वांसाठी माझ्याकडून हा ट्रिब्यूट आहे. माझ्या चाहत्यांच्या मदतीने आम्ही ३ मिनिटांत सर्वाधिक सेल्फी काढण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे त्यासाठी सर्वांचे आभार. हे खूप खास होते आणि हे माझ्या कायम लक्षात राहील. अब सेल्फी हाय सेल्फी होंगी. भेटूया शुक्रवारी सिनेमागृहात.'

अक्षयने तीन मिनिटात १८४ सेल्फी काढून हा विक्रम रचला आहे. त्याच्या या विक्रमानंतर त्याचे चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

सेल्फी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह इमरान हाशमी देखील आपल्याला दिसणार आहे. एका सेल्फीवरून सुरू झालेली ही कथा पुढे अनेक रंजक वळण घेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT