Akshay Kumar New Film Update
Akshay Kumar New Film Update Instagram
मनोरंजन बातम्या

Oh My God 2 Latest Update: अक्षयची चाहत्यांना गुड न्यूज, ‘ओह माय गॉड २’ रिलीज होणार ‘या’ ठिकाणी...

Chetan Bodke

Akshay Kumar New Film Update: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या अभिनयामुळे बराच ट्रोल होत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट त्याचे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. सोबतच यावर्षी त्याचा एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता, तो म्हणजे ‘सेल्फी’. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला असून चित्रपटाने इतकी खास कमाई केली नाही. अशातच बॉक्स ऑफिसवर अक्षयचा या वर्षातील दुसरा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपट सतत फ्लॉप ठरत असून त्याचा आगामी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती मिळाली होती. पण अशातच एक नवीन अपडेट मिळाली आहे.

लवकरच अक्षयचा बहुप्रतिक्षित ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट आता ओटीटीवर नाही तर, चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात अक्षय कुमार आणि निर्माते अश्विन वरदे आणि जिओ स्टुडिओज यांच्यासोबत अनेक चर्चा झाली. या चर्चेतून हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अक्षयच्या ३० वर्षांच्या सिनेकारकिर्दितील हा चित्रपट अत्यंत खास चित्रपट असून खुद्द त्याने ही स्वतः ही माहिती दिली आहे. फक्त अक्षयसाठीच हा खास चित्रपट नाही तर निर्मात्यांसाठी ही हा खास चित्रपट आहे. लवकरच चित्रपटाची देखील प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

अक्षय कुमारसोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी सुद्धा चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अमित राय यांच्याकडे आहे. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार अक्षयचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ओटीटीवर नाही तर, थिएटरमध्ये प्रदर्शित होत असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

Today's Marathi News Live : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT