Pathaan Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Celebrity In Pathaan Review: चाहत्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनाही शाहरुखच्या 'पठान'ची भुरळ...

‘भोला’च्या टीझर प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान अजय देवगणने पठाणबाबत भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Pathaan Review: अखेर तो दिवस आला. शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला 'पठान' चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. शाहरुख तब्बल चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसह गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. जरीही चित्रपटाला बऱ्याच प्रमाणात विरोध होत असला तरी, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘भोला’च्या टीझर प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान अजय देवगणने पठाणबाबत भाष्य केलं आहे.

पठान बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातल्या त्यात अनेक कलाकारांनाही या चित्रपटाचे वेड लागले. ‘पठान’च्या प्रदर्शनापूर्वीच्या रेकॉर्ड ब्रेक कमाईवर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला.

‘भोला’च्या टीझर कार्यक्रमादरम्यान अजय देवगणने पठाणबाबत भाष्य केलं. “कोणताही प्रदर्शित होणारा बॉलिवूड चित्रपट सुपरहिट व्हावा, अशीच माझी इच्छा आहे. शेवटी मनोरंजन विश्व एकच आहे. ‘पठान’ चित्रपटासारखं एडव्हान्स बुकिंग आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाचं झालेलं नाही. त्यामुळे चित्रपटाची झालेली कमाई पाहून माझा आनंद गगनात मावत नाही.”

अजयचा हा व्हिडिओ शाहरुख ट्विट करत म्हणतो, “अजय आत्तापर्यंत नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. मी व माझ्या परिवराप्रती त्याने नेहमीच प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. अजय देवगण एक उत्कृष्ट अभिनेता आणि सोबतच व्यक्ती आहे.”

दरम्यान ‘पठान’मध्ये प्रमुख भूमिकेत शाहरुख खान सह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT