Aishwarya Thackeray Saam Digital
मनोरंजन बातम्या

Aishwarya Thackeray : ठाकरेंचं 'ऐश्वर्य' आता बॉलिवूडमध्ये; ठाकरेंची पुढची पिढी दिसणार सिल्व्हर स्क्रीनवर

Aishwarya Thackeray News : एश्वर्यचे पणजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी श्यामची आई चित्रपटात भूमिका केली होती. तर ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केलीय. आता ऐश्वर्य कधी सिल्व्हर स्क्रीनवर झळकतो याचीच उत्स्कुता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाकरेंच्या राजकारणातल्या पिढी तुम्ही पाहिल्या आहेत. मात्र आता ठाकरेंची चौथी पिढी लवकरच बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. कोण आहे हा ठाकरे? तो कसा आहे? सध्या तो काय करतोय? यावरचा हा रिपोर्ट.

ठाकरे कुटुंब म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर राजकारणाशिवाय दुसरं काही येत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा उद्धव ठाकरेंनंतर तिस-या पिढीत आता आदित्य ठाकरे चालवताय. तर तिकडे राज ठाकरेंनंतर आता त्यांचा मुलगा अमित ठाकरेंनीही सक्रीय राजकारणात एण्ट्री केलीय. मात्र आता ठाकरेंची तिसरी पिढी बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असेल. आणि तुमच्या मनात उत्सुकताही निर्माण झाली असेल की हा कोणता ठाकरे. हा आहे पिळदार शरीर यष्टीचा हॅण्डसम बॉय ऐश्वर्य ठाकरे. ऐश्वर्य हा उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य हा सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकतोय. तो नेमका काय करतो ते पाहूयात.

कोण आहेत ऐश्वर्य ठाकरे?

ऐश्वर्य ठाकरे हा उद्धव ठाकरेंचे लहान भाऊ जयदेव आणि स्मिता ठाकरेंचे मुलगा आहे. ऐश्वर्य ठाकरे 5 वर्षापासून चित्रपटांच्या सेटवर काम करतोय. असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केलंय. तसंच तो जबरदस्त डान्सर आहेत. त्याचा फिटनेसही जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर त्याचे जोरदार फोटोशूट पहायला मिळतात. ऐश्वर्य हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह असतो.

तसं पाहिलं तर ठाकरेंची ही काही पहिलीच पिढी पडद्यावर काम करत नाहीय. एश्वर्यचे पणजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी श्यामची आई चित्रपटात भूमिका केली होती. तर ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केलीय. आता ऐश्वर्य कधी सिल्व्हर स्क्रीनवर झळकतो याचीच उत्स्कुता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT