Aishwarya Rai Abhishek Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायने सोडलं पती अभिषेक बच्चनचं घर? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Satish Kengar

Aishwarya Rai Has Moved out of The Bachchan Home?:

बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या संदर्भात एक शॉकिंग न्यूज समोर आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त झाल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती, अशातच अमिताभ बच्चन यांनी आपल्या सुनेला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे.

ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबियांसोबत राहत नसल्याची चर्चा आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, बच्चन कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'झूम'च्या वृत्तानुसारनुसार, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. दोघेही आजपर्यंत एकत्र होते ते फक्त त्यांच्या मुलीमुळे. पण आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की, दोघांचे वैयक्तिक आयुष्यही मीडिया समोर आलं आहे. (Latest Marathi News)

ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाच्या घरापासून दूर राहत असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. ऐश्वर्या ही सध्या तिच्या आईसोबत राहत आहे, असं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यात अबोला?

वृत्तात सांगण्यात आलं आहे की, तिच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की आता अभिनेत्री तिच्या आईसोबत जास्त वेळ घालवते. याशिवाय ऐश्वर्या आणि तिची सासू म्हणजेच जया बच्चन यांच्यात अबोला निर्माण झाला आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

सासू-सुनेच्या या भांडणात अभिषेक चांगलाच अडकला आहे. एकीकडे त्याच्यावर पत्नी आणि मुलीची जबाबदारी आहे आणि दुसरीकडे त्याच्या आईवडिलांबद्दल प्रेम आणि कर्तव्य आहे. अशातच हे दोघे खरंच विभक्त झाले आहेत का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT