Paris Fashion Week 2024 Social Media
मनोरंजन बातम्या

Paris Fashion Week 2024: पॅरिसच्या रेड कार्पेटवर अवतरल्या बॉलिवूडच्या तारका; दाखवला फॅशनचा 'जलवा'

Bollywood Aishwarya Rai And Alia Bhatt Look: अभिनेत्री माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

Manasvi Choudhary

संपूर्ण जगभराचं लक्ष वेधणाऱ्या पॅरिस फॅशन वीकला नुकतीच सुरूवात झाली आहे. या फॅशन वीकमध्ये सौंदर्यवती त्यांच्या स्टाईलने सर्वांचीच मनें जिंकतात. पॅरिस फॅशन शोला भारतीय सौंदर्यवतींनी देखील आपली उपस्थिती लावली आहे. यावेळी अभिनेत्रींच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी उपस्थिती दर्शवली आहे. या दोन्ही बॉलिवूड विश्वातील यशस्वी अभिनेत्री आहेत. पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि आलिया भट्टची हटके शैली चाहत्यांना पाहायला मिळाली. या दोघींचे या फॅशन शोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पॅरिस फॅशन वीक 2023 ऐश्वर्याच्या दिलखेचक सौंदर्याने पुन्हा एकदा मनं जिंकली. तर आलिया देखील नेहमीप्रमाणेच क्यूट दिसत होती. ऐश्वर्या रायने पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये रॅम्पवर चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने रेड सॅटिन फिनिश बलून मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने रेड बोल्ड लिप्स आणि फ्रीझी ओपन हेअरस्टाईल केली होती. या लूकमध्ये ऐश्वर्या ग्लॅमरस दिसत होती. ऐश्वर्याने रॅम्पवॉकवर एन्ट्री केली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं जे पाहून सर्वंच आकर्षित झाले. तिने प्रेक्षकांकडे पाहिले आणि प्लाइंग किसेसही दिले. यानंतर तिने सर्वांना नमस्कार केला.

आलिया भट्टचा लूक

पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये आलिया भट्टला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. यावेळी आलिया खूपच क्यूट दिसत होती. तिने मेटॅलिक सिल्व्हर बस्टियर ड्रेस कॅरी केला होता, ओपन हेअर स्टाईल आणि मेकअप असा आलियाचा लूक होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT