Aaradhya Bachchan Net Worth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?

Aaradhya Bachchan : नेहमी आईसोबत स्पॉट होणारी ऐश्वर्या आणि अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन किती कोटींची मालकीण आहे, हे जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच आपल्या सौंदर्याने जगला भुरळ पाडते. ऐश्वर्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलिकडेच ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. ऐश्वर्या आणि आराध्या दोन्ही मायलेकी नेहमीच एकत्र स्पॉट होतात. यांचे प्रेम चाहत्यांना खूप आवडते.

ऐश्वर्या राय बच्चन संपत्ती

ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai Bachchan) मिस वर्ल्ड बनल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ऐश्वर्या राय ब्रँडच्या जाहिरातींसाठी 7-8 कोटी रुपये घेते. ती स्वतः देखील अनेक ब्रँडची ॲम्बेसेडर आहे. ऐश्वर्या रायची गणना बॅालिवूडच्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये होते. तिने अनेक प्रॉपर्टी आणि स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहेत. तिची एकूण संपत्ती 800 कोटींची आहे. अभिषेकपेक्षा ऐश्वर्याकडे जास्त मालमत्ता आहे. ऐश्वर्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिषेक बच्चन

सुपरस्टार अमिताभ बच्चन (Abhishek Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने मोजके चित्रपट केले आहेत. त्यातील काही चित्रपट खूप सुपरहिट ठरले आहेत. अभिषेक प्रो कबड्डी लीग आणि फुटबॉल टीमचा मालक आहे. अभिषेक बच्चन एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतो. अभिषेकची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे.

आराध्या बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची लाडाची लेकीचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला. आता आराध्या (Aaradhya Bachchan ) 13 वर्षांची असून धीरूभाई अंबानीच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. आराध्या बच्चन कुटुंबाची एकमेव लहानगी वारसदार आहे. त्यामुळे सर्वच संपत्तीवर आराध्याचा वाटा आहे. मात्र यात फक्त ऐश्वर्या आणि अभिषेकची मिळून संपत्ती मोजल्यास आराध्या बच्चन 1,003 कोटींची मालकीण आहे. आराध्या प्रत्येक अवॉर्ड, फंक्शन तसेच कोणत्याही पार्टी मध्ये ती आपल्या आईसोबत म्हणजे ऐश्वर्या राय बच्चनसोबत दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT