Sushmita Sen Taali Web Series In Marathi Celebrity Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actors In Taali Webseries: सुष्मिताच्या ‘ताली’मध्ये मराठी सेलिब्रिटींचा दबदबा; ऐश्वर्या नारकरसह प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसणार प्रमुख भूमिकेत

Marathi In Taali Web Series: सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या या वेबसीरीजमध्ये अनेक मराठी सेलिब्रिटींनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

Chetan Bodke

Marathi Celebrity In Sushmita Sen's Taali Web Series:

रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या ‘ताली’चा गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या या वेबसीरीजमध्ये अनेक मराठी सेलिब्रिटींनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच या वेबसीरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या वेबसीरीजच्या ट्रेलरने सुष्मिताच्या दमदार अभिनयामुळे सर्वांचेच लक्ष वेधले. या सीरिजमध्ये सुष्मिता सेनने ट्रान्सजेंडर वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजमध्ये मराठी अनेक कलाकारांचा बोलबाला असल्याचा दिसून येत आहे. या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री कृतिका देव, सुव्रत जोशी आणि ऐश्वर्या नारकर देखील या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

वेबसीरीजमध्ये तृतीयपंथीयांच्या कार्यासाठी झटणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुष्मिता सेन दिसणार आहे. तर बालपणातील भूमिका एका मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे.  ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री कृतिका देव गौरी सावंत यांच्या बालपणातील भूमिका साकारतेय. कृतिका देव ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिनेता अभिषेक देशमुखच्या पत्नीचे पात्र साकारले आहे.

तर सुष्मिताच्या आईच्या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दिसत आहे, तर ट्रेलरमध्ये काही सीन्समध्ये सुष्मितासोबत अभिनेता सुव्रत जोशी देखील तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्याला सीरीजमध्ये पाहून प्रेक्षकांचा विश्वास बसेनासा झाला आहे. तर अभिनेत्री हेमांगी कवीदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन रवी जाधवने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT