Brahmastra Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

प्रतीक्षा संपली! रणबीर आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अनेक चाहते चित्रपटातील व्हीएफएक्सचं कौतुक करत आहेत.

Shivani Tichkule

मुंबई - रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर सध्या याच ट्रेलरची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. 2014 मध्ये या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा होती. पण ही प्रतीक्षा अखेर संपली आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शन या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये रणबीर-आलियाच्या रोमँटिक केमिस्ट्रीसोबतच भरपूर अ‍ॅक्शन देखील पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर हळूहळू रणबीर कपूर आणि आलियाची झलक पाहायला मिळत आहे.

हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर शिवा ही भूमिका साकारत आहेत. तर आलिया भट्ट इशाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा देखील दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्याच्या उमरी मेघे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा एल्गार; गृहपालांच्या बदलीची मागणी

Belly Fat: जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

Poonam Pandey: आधी मरणाचं नाटक आणि आता म्हणते, 'मी प्रेग्नेंट नाही...'; पूनम पांडेने पुन्हा केली चाहत्यांची मस्करी

NHAI मध्ये काम करण्याची संधी; समर इंटर्नशिप सुरु; मिळणार स्टायपेंड; वाचा अर्जप्रक्रिया

Gulkand Benefits In Summer: उन्हाळ्यात दररोज १ चमचा 'गुलकंद' खाल्ल्याने शरीरात होतील 5 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT