Instagram Reels Star Leena Nagwanshi Dies Saam TV
मनोरंजन बातम्या

Instagram Reels Star : तुनिषानंतर आणखी एका स्टारने संपवलं जीवन; घराच्या गच्चीवर आढळला मृतदेह

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनं खळबळ उडाली असताना आणखी एका अभिनेत्रीने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Satish Daud

Instagram Reels Star Leena Nagwanshi Dies : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनं खळबळ उडाली असताना आणखी एका अभिनेत्रीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. छत्तीसगडमधील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार लीना नागवंशी हिने आत्महत्या केली आहे. लीनाचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आलाय. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लीना ही छत्तीसगड इथल्या रायगडच्या केलो बिहार कॉलनीत राहत होती. मंगळवारी तिचा मृतदेह घराच्या गच्चीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत लीनाच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह खाली उतरवला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. लीना नागवंशी ही बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.

लीनाच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तिने आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. लीनाचा कुणाशीही वाद नव्हता, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. मृत्युच्या अवघ्या २ दिवस आधी लीनाने सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

Maharashtra Live News Update : रवींद्र धंगेकर यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटानं डाव टाकला; महायुतीत फुटीची शक्यता

SCROLL FOR NEXT