Shefali Jariwala Husband Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala Husband: शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर; पती पराग त्यागीचे पहिले विधान म्हणाला, 'माझ्या परीसाठी प्रार्थना...'

Shefali Jariwala Husband: शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाचा सर्वात मोठा धक्का तिचा पती पराग त्यागी आणि कुटुंबाला बसला आहे. अंत्यसंस्कारानंतर पराग त्यागी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.

Shruti Vilas Kadam

Shefali Jariwala Husband: शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने केवळ इंडस्ट्रीच नाही तर तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. २७ जूनच्या रात्री तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले जात आहे.

काल संध्याकाळी, पोस्टमॉर्टेमनंतर शेफाली जरीवालावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्रीच्या आईला तिच्या मृत्यूने पूर्णपणे धक्का बसला होता. ती बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिचे वडील आणि कुटुंबातील सदस्यांचीही प्रकृती वाईट होती, विशेषतः तिचा पती पराग त्यागी.

शेफालीच्या जाण्याने पराग त्यागीला अश्रू अनावर

पराग त्यागी त्याची पत्नी शेफालीवर खूप प्रेम करायचा. अशा परिस्थितीत, तिच्या जाण्याने तो आतून पूर्णपणे तुटला आहे. त्याने शेवटच्या वेळी त्याच्या पत्नीच्या कपाळावर किस करुन तिच्या शेवटच्या क्षणी तिच्यावर असलेल त्याच प्रेम व्यक्त केल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो रडतानाही दिसत होता.

पराग त्यागी यांनी त्यांच्या पत्नीच्या निधनावर पहिल्यांदाच भाष्य केले

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पहिल्यांदाच पराग त्यागीने आपले मौन सोडले आहे. जेव्हा तो त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर घरी जात होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, "कृपया माझ्या परीसाठी प्रार्थना करा. ती जिथे असेल तिथे आनंदी राहो. तिला शांती लाभो आणि कृपया हे सगळ आत्ता थांबवा."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT