शाहरुखपाठोपाठ आर्यनची भेट गौरी खान आर्थर रोड कारागृहात Saam Tv
मनोरंजन बातम्या

शाहरुखपाठोपाठ गौरी खानने घेतली आर्यनची भेट

आज शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाचा ३०वा वाढदिवस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - क्रुझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी कार्डिलिया क्रूझ प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला विशेष एनडीपीएस न्यायालयाचे व्हि व्हि पाटील न्यायमूर्तींनी जामीन नाकारला आहे. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली होती. त्यानंतर आता गौरी खान आर्यनची भेट घेण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहोचली होती.आज शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाचा ३०वा वाढदिवस आहे. दिग्गज वकिलांची फौज उभी करून देखील आर्यनची जेलमधून सुटका झाली नाही. त्यामुळे आता गौरी आर्यनला भेटायला आर्थर रोड तुरुंगात त्याची भेट घेण्यासाठी पोहोचली होती.

कोरोना काळात जेल बंद असल्याने नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. नातेवाईकांना आता कैद्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT