Deepika Padukone Press Conference  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: 'पठान' चित्रपटाविषयी अनुभव सांगताना दीपिका पदुकोण रडली; म्हणाली, 'शाहरूखसाठी...'

मी आणि शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. परंतू माझ्यासाठी हा चित्रपट फारच वेगळा होता.

Chetan Bodke

Deepika Padukone: गेल्या अनेक दिवसांपासून 'पठान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची चर्चा सुरु झाल्यापासून शाहरुखसह चित्रपटातील कोणत्याही कलाकाराने माध्यमांसोबत संपर्क साधला नव्हता. अखेर आज चित्रपटातील कलाकारांनी माध्यमांसोबत संपर्क साधला. यावेळी दीपिकानेही माध्यमांसोबत संपर्क साधला.यावेळी तिने चित्रपटाविषयी आपला अनुभव सांगितला.

दीपिका आणि शाहरुखचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना माहित आहेत, यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपली दमदार भूमिका उमटवली आहे. यावेळी चित्रपटाविषयी बोलताना दीपिका म्हणते, "मी आणि शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. परंतू माझ्यासाठी हा चित्रपट फारच वेगळा होता. अनेकांना माहित आहे, मला कोणत्याही गोष्टीचा आनंद होतो तेव्हा नक्कीच डोळे पाणावतात." त्यावेळी ही दीपिकाचे अचानक डोळे पाणावले.

सोबतच पुढे दीपिका म्हणते, "माझ्यासाठी आणि शाहरुखसाठी हा चित्रपट फारच खास होता. आम्ही आतापर्यंत अनेक चित्रपट केले असले तरी त्यावेळी फक्त आमचे रोमँटिक सीन होते. परंतू या चित्रपटात मी आणि शाहरुखने काही फायटिंगचे ही सीन दिले आहेत. त्यामुळे खरंच माझ्यासाठी हा वेगळा चित्रपट होता."

"चित्रपटात भूमिका करताना अनेक आमच्यावर थोडे दडपण होते. पण शाहरुखसोबत शुटिंगला सुरुवात झाली आणि सर्व टेंशन गेले. मी आतापर्यंत शाहरुखसोबत चार ते पाच चित्रपट केले आहेत, ते अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत होते. आता हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई करीत आहे. प्रेक्षकांनी दिलेले हे प्रेम आमच्या साठी फारच अनोखे होते."

शाहरुख खान, दीपिका पदुकोण सोबत जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असलेल्या 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हा सिनेमा २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आता पर्यंत ५४३ कोटींची कमाई केली होती. सोबतच चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT