Deepika Look In Pathaan
Deepika Look In Pathaan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Trailer: 'बेशरम रंग'च बदलला, पठानच्या ट्रेलरमध्ये दीपिका दिसते वेगळीच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Deepika Padukone Changed in Pathan: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठान' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. तिच्या या बिकिनीवरी अनेकांत संघटनांनी विरोध केला होता. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीला झालेला विरोध इतका तीव्र होता की सेन्सॉर बोर्डने चित्रपटामध्ये बदल करण्याचे आदेश 'पठान'च्या निर्मात्यांना दिले होते.

'पठान' चित्रपटाचा ट्रेलरला खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ३ तासात या चित्रपटाला ३. ६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. दीपिकाचा ट्रेलर मधील लुक फारच वेगळा दिसत आहे. ट्रेलरमध्ये दीपिकचे केस खूपच छोटे दिसत आहेत. तसेच तिने खूप टाईट ड्रेस घातला आहे. ट्रेलरमध्ये ती पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. दीपिकाने 'बेशरम रंग'मध्ये घातलेल्या बिकिनीमध्ये थोडा ट्विस्ट देण्यात आला आहे जो आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहे.

दीपिकाचे गाण्यातील ड्रेससिंग आणि ट्रेलरच्या आउटफिटमध्ये फारसा फरक नाही. तिची वादग्रस्त भगव्या रंगाची बिकिनी ट्रेलरमध्ये सुद्धा दिसत आहे. गाण्यात दीपिकाने घातलेली बिकिनी भगव्या रंगाची होती. पण ट्रेलरमध्ये तिने या बिकिनीवर पांढरा टॉप घातला आहे आणि ती अॅक्शन सीन करताना दिसत आहे. अशाप्रकारे सेन्सॉर बोर्डाकडून सूचना मिळाल्यानंतर काही दृश्ये बदलण्यात आली आहेत, असे म्हणता येईल.

'बेशरम रंग' गाण्यातील दीपिकाच्या बोल्डेनस आणि बोल्ड ड्रेसची सर्वत्र चर्चा होती. दीपिकाचा या गाण्यातील बोल्ड लूक याआधी कधीही दिसला नव्हता. तिचा हा लूकचा नंतर वादाचे कारण बनला. पण ट्रेलर प्रदर्शित करताना निर्मात्यांनी विशेष काळजी घेतली आहे. तिचे ड्रेस जास्त उघड होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचे वाद उद्भवू नयेत याची खात्री करताच निर्मात्यांनी ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच त्यात काय बदल करण्यात आले हे स्पष्ट होईल.

चित्रपटाच्या ट्रेलरविषयी बोलायचे झाले तर हा एक अॅक्शन पॅक्ड ट्रेलर आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खान जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. चित्रपटामध्ये VFXचा खूप जबरदस्त वापर करण्यात आल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. या ट्रेलरमधून चित्रपटातील सर्व पात्रांबद्दल माहिती मिळत आहे. 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडणार नाही, असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT