Afaratfari Movie saam Tv
मनोरंजन बातम्या

Afaratfari Movie: नोटा, धावपळ अन् भरपूर गोंधळ; संजय नार्वेकरांच्या 'अफरातफरी' चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Afaratfari Movie: ‘अफरातफरी’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पैशांचा गोंधळ, पोलिसांची धावपळ आणि तगडा कलाकारवर्ग असलेला हा चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Afaratfari Movie: नोटांचा पाऊस, त्यांच्या मागे लागलेली माणसं, पोलिसांची धावपळ आणि या सगळ्यातून उडालेला गोंधळ… हे सगळं पाहायला मिळतंय ‘अफरातफरी’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये. पैशांचा हा मामला नेमका काय आहे आणि त्यासाठी एवढी धावपळ का सुरू आहे, याची उत्सुकता या मोशन पोस्टरने निर्माण केली आहे. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित, अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेला हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोशन पोस्टरमध्ये गावाकडची पार्श्वभूमी आणि हवेत उडणाऱ्या नोटांसोबत एकामागोमाग एक पात्रं धावताना दिसतात. कुणाच्या हातात बंदूक, कुणाच्या चेहऱ्यावर चिंता, तर कुणी पैशांच्या मागे सुसाट धावतंय… आणि या सगळ्या धावपळीच्या पार्श्वभूमीवर ‘सोड चिंता असते ती चितेसमान, कर्म कर, तू ठेव गीतेचा मान’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते, फळाची चिंता सोडून दे’ या गीतेतील ओळी ऐकू येतात. मोशन पोस्टरमधील या ओळी आणि त्याला जोडलेला पैशांचा गोंधळ यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दलचं कुतूहल आणखी वाढतं. या सगळ्या गोंधळामागचं कारण काय आणि या पैशांमुळे कोणाच्या आयुष्यात काय उलटापालट होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

अफरातफरी’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात एकापेक्षा एक दमदार कलाकार एकत्र आले आहेत. मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची रंगत आणि पैशांभोवती फिरणारी गंमतीदार कथा यामुळे ‘अफरातफरी’चा हा गोंधळ प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, ‘’ ‘अफरातफरी’ हा मनोरंजनाने भरलेला चित्रपट आहे. पैशांभोवती फिरणाऱ्या या कथेत अनेक पात्रं आणि त्यांच्या वाट्याला येणारे मजेशीर प्रसंग यामुळे परिस्थिती अधिकच गुंतत जाते. मोशन पोस्टरमधून या गोंधळाचा अंदाज येतो. कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री, विनोद आणि सतत रंगणारी धावपळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT