Adipurush Trailer Leaked Instagram @kishorepoudala
मनोरंजन बातम्या

Adipurush Trailer Leaked: जय श्री राम! प्रदर्शनापूर्वीच 'आदिपुरुष'च्या ट्रेलरची चर्चा

Adipurush Trailer Launch: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या ट्रेलरचे अनेक रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Pooja Dange

Adipurush Trailer Leaked On Social Media: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाले असून आज ९ मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि क्रिती सेनन त्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी हैदराबादला पोहोचले आहेत. एएमबी सिनेमा येथे चाहत्यांसाठी ट्रेलरचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच ते सोशल मीडियावर लीक केले झाले, यामुळे खळबळ उडाली आहे.

'आदिपुरुष' चित्रपटाच्या ट्रेलरचे अनेक रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रेक्षकही या ट्रेलरला पसंती देत ​​आहेत. टीझरपेक्षा ट्रेलर चांगला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. निर्मात्यांनी चित्रपटात काही बदल केल्यामुळे, त्यांनी व्हीएफएक्स बदल्याने प्रेक्षकांना ट्रेलर आवडला असल्याचे म्हटले जात आहे. कारवाई केल्यानंतर लीक झालेला ट्रेलर सोशल मीडियावरून हटविण्यात आला आहे.

प्रभाससोबतच क्रिती सेनन आणि दिग्दर्शक ओम राऊत हैदराबादमध्ये ट्रेलर लॉन्चसाठी पोहोचले आहेत. तेथे त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि आता ते सत्व आज 9 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या हिंदी ट्रेलरच्या भव्य कार्यक्रमासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर याबद्दल अपडेट देखील दिले आहे. (Latest Entertainment News)

आदिपुरुष लीक सीन

आदिपुरुषच्या लीक झालेल्या ट्रेलरबद्दल सांगायचे तर, वनवासात जाण्याचा सिक्वेन्स दाखवण्यात आला आहे. राम आणि लक्ष्मणाला सबरीची उष्टी बोरं खाताना दाखविण्यात आले आहे. यानंतर हनुमानाला भेटणे आणि लगेचच वनौषधी आणणे हे सीन दाखवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर हनुमान जी अंगठी घेऊन सीता मातेकडे जात आहेत, त्याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. जळालेली लंका आणि त्यावर वानरसेनेची लढाई देखील दाखवण्यात आली आहे.

सैफ अली खान कॉन्ट्रोवर्सी

इतकेच नाही तर यावेळी ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी सावधगिरी बाळगली आहे. त्यांनी सैफ अली खानला रावण म्हणून दाखवलेले नाही. अडीच मिनिटांच्या संपूर्ण ट्रेलरमध्ये सैफ अली खान दोन ठिकाणी दिसला, मात्र त्यादरम्यान त्याचा मृतदेह दाखवण्यात आला. ऑक्टोबर 2022 मध्ये सैफच्या दाढी आणि मिशांबाबत जो वाद झाला होता, तो पुन्हा होऊ नये म्हणून कदाचित निर्मात्यांनी हे केलं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT