Adipurush break record of Bahubali 2, RRR and KGF 2 Instagram/ @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush Breaks Record: आदिपुरुषची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई ; बाहुबली 2, आरआरआर, केजीएफ 2 चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक

Adipurush Collection : प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर या चित्रपटाने दमदार कमाई करत विक्रम केला आहे.

Pooja Dange

Adipurush Breaks Record Of Most Successful Movies : आदिपुरुष चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ट्रोलर्सनी देखील चित्रपटाला ट्रोल करण्याची एकही संधी सोडली नाही. पण याचा परिमाण चित्रपटाच्या कलेक्शनवर मात्र जराही झाला नाही.

प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर या चित्रपटाने दमदार कमाई करत विक्रम केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपट १०० कोटींचे कलेक्शन करेल असा अंदाज ट्रेड अॅनालिस्टच्या बांधला होता. (Latest Entertainment Movie)

पण त्यांचे अंदाज मोडीन काढत चित्रपटाने जागतिक स्तरावर १४० कोटी रुपये कमवले. ट्रोलींगमुले दुसऱ्या दिवशीही चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होईल असे अनेकांना वाटत होते पण तसे काहीच झाले नाही.

जागतिक स्तरावर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 240 कोटी रुपये असून दुसऱ्या दिवशी आदिपुरुष चित्रपटाने 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या कमाई सध्या स्थिर आहे. प्रभास स्टारर बाहुबली 2 या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी घसरण झाली होती.

बाहुबली: द कन्क्लुजन चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये घट झाली होती. बाहुबली 2, RRR आणि KGF 2 सारख्या अनेक लार्गर देन लाईफ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी घसरण झाली होती.

मात्र त्यानंतर या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली होती. मात्र, प्रत्येक भारतीयाचा चित्रपट असलेला आदिपुरुष दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई करत नवा विक्रम रचत आहे.

शनिवारी आदिपुरुष चित्रपटाच्या कलेक्शनचा आलेख उंचावला आहे, तसेच हा आलेख आणखी वर जाईल असे म्हटलं जात आहे. आदिपुरुष इतर चित्रपटांप्रमाणे ब्लॉकबस्टर ठरेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद अप्रतिम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली गडचिरोली जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

तहसीलदार कार्यालयातील लिपिक ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रांगेहाथ पकडला

Rashmika-Vijay Wedding Photo: 'माझी बायको... माझा नवरा...'; रश्मिका-विजयच्या शाही लग्नाचे फोटो व्हायरल

१३ कोटींचा हायड्रो गांजा पकडला; नवी मुंबईत धडक कारवाई, पुणे कनेक्शन, VIDEO

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; Points Table मधील उलटफेरानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार?

SCROLL FOR NEXT