अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोविडमुळे निधन... Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोविडमुळे निधन...

शाहीर शेख यांच्या परिवासरासाठी आज दुःखाचा दिवस आहे. व्हेंटिलेटरवर असलेले त्यांचे वडील शाहनवाज शेख यांचे आता निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाहीर शेख यांच्या परिवासरासाठी आज दुःखाचा दिवस आहे. कोविडमुळे व्हेंटिलेटरवर असलेले त्यांचे वडील शाहनवाज शेख यांचे आज निधन झाले आहे. शाहीरने अलीकडेच त्याच्या चाहत्यांना माहिती दिली होती की, त्याच्या वडिलांना कोविड-19 मुळे (Covid -19) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोविड-19 संसर्गामुळे त्यांची तब्येत अत्यंत गंभीर होती आणि व्हेंटिलेटरवर होते. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या हिंदी मालिकेत काम करत असलेल्या या अभिनेत्याने अद्याप त्याच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावर काही पोस्ट केलेले नाही. परंतु अभिनेता अली गोनीने या बातमीला दुजोरा दिला आहे. (Shaheer Sheikh's Father Dies)

अभिनेता अली गोनीने आज, 20 जानेवारी रोजी शाहीरच्या वडिलांच्या निधनाबद्दल ट्विट केले. त्यांनी लिहिले आहे.

जेव्हा शाहीर शेखने आपल्या चाहत्यांना वडिलांसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली

18 जानेवारी रोजी, शाहीर शेखने ट्विटरवर आपल्या सांगितले की, त्यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले होते की, त्याच्या वडिलांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला होता आणि ते रुग्णालयात दाखल होते. त्याने ट्विटरवर ही बातमी त्याच्या फॉलोअर्ससोबत शेअर केली आणि लिहिले, "माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत, गंभीर कोविड संसर्गाने त्रस्त आहेत, कृपया त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा." शाहीरने वडिलांचा फोटोही शेअर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT