Urvashi Rautela Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाला चक्क हॉस्पिटलमध्ये पाठवले १ लाख गुलाब; कोणी दिले? नेटकऱ्यांनी लावले तर्कवितर्क; Video पाहा

Urvashi Rautela Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्वशी चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. नुकतेच उर्वशीने गुलाबांच्या फुलांमधला तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वीच रूग्णालयात असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. उर्वशीच्या हाताच्या बोटाला जखम झाल्याने रूग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर उर्वशीने याबाबतची माहिती दिली होती. उर्वशीला अचानक रूग्णालयात दाखल केल्याने चाहत्यांना देखील धक्का बसला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्वशी चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. नुकतेच उर्वशीने गुलाबांच्या फुलांमधला तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. गुलाबाच्या फुलांमध्ये उर्वशी बसलेली दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने, 'माझ्या चाहत्यांनी मला १ लाख गुलाबाची फुले पाठवली आहेत. आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. खूप खूप प्रेम' असं म्हटलंय.

उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. एका नेटकऱ्यांने, ही भारतातील पहिला महिला आहे जिने पब्लिसिटी संस्टसाठी असा प्रयोग केला आहे. तर आणखी एकाने, अजून किती ओव्हरअॅक्टिंग करणार, हे सर्व गुलाब तिने स्वत: खरेदी केले असल्याचं म्हटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Makeup Tips: ५ मिनिटांत व्हा तयार! या क्विक डेली मेकअप टिप्स नक्की वापरा, मिळेल ग्लॅमरस लूक

Pregnancy Care: उन्हाळ्यात प्रेग्नन्सी? डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

EPFO Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Accident : मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक; आरोपी फरार

Maharashtra Live News Update: वसईतील स्वघोषित भोंदू बाबावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT