Urvashi Dholakiya Saam TV
मनोरंजन बातम्या

Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकिया थोडक्यात बचावली, कारला स्कूल बसची जोरदार धडक

उर्वशी ढोलकिया एका फिल्म स्टुडिओत शूटिंगसाठी जात असताना एका स्कूल बसने तिच्या कारला मागून धडक दिली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 'कसौटी जिंदगी की' या प्रसिद्ध सिरीयलमधील कोमोलिका म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. उर्वशी ढोलकिया शनिवारी या अपघतात थोडक्यात बचावली.

उर्वशी ढोलकिया एका फिल्म स्टुडिओत शूटिंगसाठी जात असताना एका स्कूल बसने तिच्या कारला मागून धडक दिली. ही सर्व घटना काशिमीरा येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकिया तिच्या कारमधून मीरा रोड येथे फिल्म स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी निघाली होती. मात्र त्याचदरम्यान काशिमिरा येथे मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने उर्वशी ढोलकियाच्या कारला मागून धडक दिली. (Latest News Marathi)

उर्वशीने स्कूल बस चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

उर्वशी ढोलकियाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, तिला सर्वात जास्त प्रेम ‘कसौटी जिंदगी की’मधून मिळाले. तिने मुख्य अभिनेत्री म्हणून नव्हे तर खलनायक म्हणून सर्वांची मने जिंकली. यानंतर उर्वशीने नाग बनूनही लोकांच्या मनात भीती निर्माण केली. नागिन 6 मध्येही ती खलनायकाच्या भूमिकेत दिसली होती. कामापेक्षा उर्वशीच्या वैयक्तिक आयुष्यानेही लोकांना खूप आश्चर्यचकित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

पावसाळ्यात तुम्ही कधी कुरकुरीत 'कंटोळी फ्राय' खाल्ली आहे का? एकदा नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी

ACमुळे वाढतंय तुमचं वजन? काय म्हणतात तज्ज्ञ?

SCROLL FOR NEXT