Urfi Javed Pink Shirt New Dress Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Shirt Dress: उर्फीचा नादच खुळा; तिचा नवीन फॅशन पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Video...

Urfi Javed News: उर्फीने एक जबरदस्त ड्रेस परिधान करत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed Pink Shirt New Dress

अभिनेत्री उर्फी जावेद कायमच फॅशन जगतातलं चर्चित नाव. अनेक बड्या अभिनेत्रींना मागे टाकत उर्फी आपल्या अतरंगी फॅशनमुळे ओळखली जाते. उर्फीला गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या अतरंगी फॅशनमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. पण ऐकेल ती उर्फी कसली? तिने तिच्या फॅशनची कमाल चालुच ठेवली आहे. नेहमीच कल्पने पलिकडच्या गोष्टींचा वापर करुन उर्फी फॅशन करण्याचा प्रयत्न करते. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फीने जीन्सचा वापर करुन सुद्धा फॅशन केली होती. आता यावेळी सुद्धा उर्फीने चाहत्यांसमोर एक हटके फॅशन केली आहे. यावेळी उर्फीने एक जबरदस्त ड्रेस परिधान केला आहे. उर्फीने ७ कॉलर पिंक ड्रेस परिधान केला आहे.

कायमच वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करुन फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कायम चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न उर्फी करते. आतापर्यंत उर्फीने, कंगवा, झा़डांचे पानं, ब्लेड, फुलं, टोपली, चिंगम, सिमकार्ड अनेक विचित्र गोष्टींचा वापर करुन उर्फीने आपल्या फॅशनची हौस पुर्ण केली आहे. अभिनेत्रीची ही फॅशन पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर उर्फीचा ७ कॉलर पिंक ड्रेस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. अभिनेत्री त्या फॅशनमध्ये खूपच सुंदर दिसतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खुद्द तिनेच शेअर केलेला आहे. (Fashion)

उर्फी जावेदने अवघ्या काही मिनिटांपूर्वीच तो व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओत तिने गुलाबी रंगाचा शर्टांचा ड्रेस परिधान केलेला आहे. या ड्रेसवर तिने फ्रेंच स्टाइल हेअरस्टाइल केली असून ज्यावेळी ती या हटक्या लूकवर पापाराझींच्या समोर आली, त्यावेळी तिला स्पॉट करण्यात आलं. यावेळी अभिनेत्रीने त्या ड्रेसवर हाय हिल्स, हेअर बन आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केलेला दिसून येत आहे. पुन्हा एकदा उर्फीच्या या हटक्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं जात आहे. कायमच उर्फीच्या फॅशनचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक केलं जातं. व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून तिच्या फॅशनवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्रीचीही भन्नाट फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीने सोशल मीडियावर कंगव्याचा वापर करुन, स्क्रुचा वापर करुन, झाडांचा आणि त्याच्या मुळांचा वापर करुन तिने फॅशन केली होती. तिच्या फॅशनचे सर्वत्र कौतुक कायम होत असते. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचे तर, उर्फी जावेदने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की २’ आणि ‘बेपनाह’सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन सिरियलमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मात्र ती बिग बॉस ओटीटीमुळे प्रचंड प्रसिद्धीमध्ये आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT