Urfi Javed New Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed New Video: हाय हिल्स घालणं उर्फीला पडलं महागात, भररस्त्यात पडता पडता वाचली; VIDEO होतोय व्हायरल

Actress Urfi Javed : रोज नवनवीन ड्रेसिंग स्टाईलमध्ये बाहेर पडणाऱ्या उर्फीला पाहण्यासाठी रस्त्यावर देखील गर्दी होते.

Priya More

Urfi Javed Viral Video:

टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Actress Urfi Javed) आपल्या हटके आणि अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी फाटके, कधी अर्धवट तर कधी कोणत्याही वस्तूंपासून तयार केलेले ड्रेस घालून उर्फी जावेद ही घराबाहेर पडत असते. उर्फी जावेदचा हा जलवा पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुकच असतात.

रोज नवनवीन ड्रेसिंग स्टाईलमध्ये बाहेर पडणाऱ्या उर्फीला पाहण्यासाठी रस्त्यावर देखील गर्दी होते. अशामध्ये आपल्या नव्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये घराबाहेर पडलेली उर्फी जावेद भररस्त्यात पडता पडता वाचली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद यावेळी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत आली नाही तर ती तिच्या हाय हिल्समुळे चर्चेत आली आहे. हे हाय हिल्स घालणं उर्फीला महागात पडलं आहे. उर्फी जावेद नवीन ड्रेसिंग स्टाईल करुन घराबाहेर पडली. उर्फीने पिंक कलरचा फॅन्सी वनपीस परिधान केला होता.

उर्फी नवा स्टायलिश ड्रेस परिधान करून तिच्या कारमधून बाहेर पडली. पण हटके डिझाइन असलेले हाय हिल्स घातल्यामुळे उर्फीला रस्त्यावरून चालता आले नाही. तिचा तोल गेला आणि ती पडता पडता वाचली. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात उर्फीचा पाय अडकला आणि ती भररस्त्यात पडली असती पण तिने स्वत:ला सांभाळले.

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे देखील दिसत आहे की, उर्फी जावेद फोटो काढताना फोनवर बोलणाऱ्या पापाराझीवर भडकली. ती थेट त्याचा फोन घेते आणि कामावर आहे. का सारखा कॉल करत आहे. कामावर असल्यावर कॉल करू नको, असं बोलून फोन कट करते. यावेळी उर्फी जावेद काही इज्जतच नाही असे बोलते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT