trisha krishnan and vijay thalapathy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Trisha Krishnan: थलापती विजयची सत्ता; निवडणुकीचे आकडे येताच अभिनेत्री त्रिशा पोहचली भेटायला, व्हिडिओ आला समोर

Trisha Krishnan: तमिळनाडू निवडणूक निकालांदरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजयच्या घरी पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. TVK आघाडीवर असल्याने या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Trisha Krishnan: तमिळगा वेट्री कळघमतमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांदरम्यान राजकीय आणि मनोरंजन विश्व एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती विजय यांच्या निवासस्थानी पोहोचताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिशा कृष्णन नुकतीच तिरुमला मंदिराला भेट देऊन परतली होती. त्यानंतर आज तिच्या वाढदिवशीच ती विजय यांच्या घरी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, याच वेळी विजय यांच्या तमिळगा वेट्री कषघम (TVK) पक्षाला निवडणुकीत आघाडी मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर त्रिशाची ही भेट अधिक चर्चेत आली आहे. तिचा विजयच्या घराबाहेरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या भेटीला केवळ मैत्रीपूर्ण भेट मानत आहेत, तर काहीजण यामागे राजकीय अर्थ काढत आहेत.

त्रिशा आणि विजय यांची जोडी याआधी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे आणि त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. अनेक जन त्रिशा ही विजय यांच्यासाठी लकी असल्याचे सोशल मीडियावर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत.

दरम्यान, विजय यांनी स्थापन केलेला TVK पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरला असून सुरुवातीच्या ट्रेंड्समध्ये त्यांना चांगली आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातही विजय यांची एंट्री दमदार ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत-अमेरिकेत तणाव वाढला, जहाजावरील हल्ल्यानंतर भारत आक्रमक

राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा, ऑपरेशन टायगर VS ऑपरेशन लांडगा

मुंबईच्या वडाळ्यात गटार सफाईसाठी बालकामगारांचा वापर? बीएमसी-कंत्राटदारांवर गंभीर आरोप

धक्कादायक! साई संस्थानच्या भक्त निवासात भाविक तरुणीचा विनयभंग, शिर्डीत खळबळ

देशाच्या राजकारणात उलथापालथ; माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का, बंडखोर खासदारांचा नवा पक्ष ठरला?

SCROLL FOR NEXT