Marathi Actress In Adipurush Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Actress In Adipurush : आदिपुरुष पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना मिळाले सरप्राईज; मराठमोळी अभिनेत्री चित्रपटामध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका

Adipursh Actors : चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, देवदत्त नागे, सनी सिंह अशी कलाकारांची फौज आहे. तर चित्रपटामध्ये आणखी एक मराठमोळी अभिनेत्री देखील झळकली आहे.

Pooja Dange

Tejaswini Pandit In Adipurush : ओम राऊत यांचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, देवदत्त नागे, सनी सिंह अशी कलाकारांची फौज आहे. तर चित्रपटामध्ये आणखी एक मराठमोळी अभिनेत्री देखील झळकली आहे. चला तर पाहूया कोण आहे ही अभिनेत्री.

आदिपुरुष चित्रपटातील राम, सीता, लक्ष्मण, हनुमान ही पात्र साकारणारे कलाकार जगजाहीर आहेत. पण या चित्रपटामध्ये अनेक महत्वाच्या भूमिका आणि कलाकार आहेत. त्यातील एक पात्र म्हणजे शुर्पणखा. तर आदिपुरुष या चित्रपटातील हे पात्र मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारले आहे.

काही महिन्यांपूर्वी या अभिनेत्रीने याची माहिती दिली होती. परंतु तिच्या भूमिकेविषयी खुलासा केला नव्हता. तर चित्रपटाच्या निर्मात्यांकडून देखील याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना हे एक सरप्राईज होत.

आदिपुरुषमध्ये चित्रपटामध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आहे. तेजस्विनी या चित्रपटामध्ये शूर्पणखा ही भूमिका साकारत आहे. शूर्पणखा ही एक राक्षसीण आणि रावणाची बहीण असते. लक्ष्मण तिचे नाक कापतो त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी ती तळमळ असते.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटामध्ये आपण देवदत्त मागेल पहिले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हनुमान दिसल्यापासून त्याची चर्चा आहे. पण तेजस्विनी आणि तिच्या भूमिकेविषयी कुठेही गाजावाजा होताना दिसत नाही.

आदिपुरुष चित्रपटाची क्रेज साध्य पहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच चित्रपटासाठी गर्दी केली आहे. या बिग बजेट चित्रपटाने चित्रपट प्रदर्शित होण्याआधी कमाई कार्याला सुरूवात केली आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर किती कमाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime: डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज विकताना अटक, ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

UPSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; UPSC ने जारी केली भरती; अर्ज कसा करावा?

Dhananjay Mundhe : दारू पिऊन सुसाट चालवली गाडी, धनंजय मुंडेंच्या समर्थकाचा प्रताप; VIDEO व्हायरल

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT