actress Tamannaah Bhatia spoke about her experience with Vijay Varma Lust Stories 2  Instagram @tamannaahspeaks
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia FINALLY Reacts: विजय वर्मासोबत तमन्नाने दिले इंटिमेट सीन ; अनुभव शेअर करत म्हणाली...

Tamannaah Bhatia Opens Up : तमन्ना आणि विजयचा एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Pooja Dange

Tamannaah Bhatia on Intimate Scenes : लस्ट स्टोरीज २ मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या दोघांची खरी प्रेमकथा पाहायला आणि ऐकायला त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. लस्ट स्टोरीज चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

अलीकडेच तमन्ना आणि विजय वर्मा यांनी त्यांचे नाते जाहीर केले आहे. तमन्नाने लस्ट स्टोरीज 2 मधील विजयसोबतच्या तिच्या इंटिमेट सीनबद्दलचा अनुभव शेअर केला आहे.

तमन्नाने एका मुलाखतीत तिच्या सह-कलाकारासह दिलेल्या इंटिमेट सीनविषयी सांगितले आहे. विजयने तिला खूप सुरक्षित आणि कम्फर्टेबल वातावरण निर्माण केले होते. तमन्ना म्हणाली की, 'मला कधीही कोणत्याही अभिनेत्यासोबत इतके सुरक्षित वाटले नाही आणि एखाद्या अभिनेत्यासाठी त्यांच्या सहकलाकाराला सुरक्षितता वाटणे खूप महत्त्वाचे आहे. (Latest Entertainment News)

एखाद्या चित्रपटांमध्ये असे सीन करणे ही खूप मोठी गोष्ट असते. परंतु विजयने मला इतक्या सुरक्षित वातावरणाची भावना निर्माण केली की मी काहीही बोलायला आणि करायला तयार झाले.'

विजयविषयी बोलताना तमन्ना म्हणाली की, त्याने मला खूप सुरक्षित आणि कम्फर्टेबल फीलिंग दिली. मला त्याच्याबद्दलची ही गोष्ट खूप आवडते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेटिंगच्या बातम्यांची खूप दिवसांपासून चर्चा होत होती. आता दोघांनीही ते मान्य केले आहे.

गोव्यातून तमन्ना आणि विजयचा एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत होते, तेव्हापासून त्यांच्या डेटींगच्या चर्चा होऊ लागल्या. तमन्नाने एका मुलाखतीत विजय वर्माला तिची हॅपी प्लेस असल्याचे सांगितली आहे आणि विजय वर्मानेही ती मान्य केली आहे.

आर बाल्की दिग्दर्शित, 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये कोंकणा सेन, नीना गुप्ता, काजोल, तमन्ना भाटिया आणि मृणाल ठाकूर, अंगद बेदी आणि विजय वर्मासारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 29 जून रोजी ओटोटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT