Sushmita Sen instagram/@sushmitasen47
मनोरंजन बातम्या

सुष्मिता सेन 'या' व्यक्तीमुळे पुन्हा आली चर्चेत, व्हायरल व्हिडिओनंतर जोरदार चर्चा

विश्वसुदंरी आणि बॅालिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जबरदस्त चर्चेत आहे. अलीकडेच सुष्मिता सेन ललित मोदीसोबतच्या तिच्या रिलेशनशिपमुळे प्रसिद्धीझोतात आली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: विश्वसुदंरी आणि बॅालिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जबरदस्त चर्चेत आहे. अलीकडेच सुष्मिता सेन ललित मोदीसोबतच्या तिच्या रिलेशनशिपमुळे प्रसिद्धीझोतात आली. सोशल मीडियावर देखील या दोघांबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अद्यापही सुष्मिताने त्यांच्या नात्याबद्दल थेट काही स्पष्ट सांगितलेले नाही. याचदरम्यान, आता पुन्हा एकदा सुष्मिता सेन एका व्यक्तीमुळे चर्चेत आली आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून, सुष्मिताचा एक्स बॅायफ्रेड रोहमन शॅाल आहे.

नुकताच ९ ऑगस्टला सुष्मिताच्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. सुष्मिताने आईचा वाढदिवस कुटुबांसमवेत साजरा केला. दरम्यान या वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये कुटुबांसमवेत एका व्यक्तीनेही हजेरी लावली होती. आता त्या व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सुष्मिता सेन आईच्या वाढदिवशी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर लाईव्ह आली होती. यावेळेस तिने तिच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. आईला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वाचे आभार देखील मानले. याचदरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुष्मिता ही मुली, आई आणि एक्स बॅायफ्रेड रोहमन शॅाल सोबत दिसते. रोहमन सुष्मिताच्या कुटुबांसमवेत आंनदी दिसतो आहे.

सुष्मिताचा लाईव्ह व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून सुष्मिताचे चाहते खूश आहेत, मात्र सुष्मितासोबत रोहमनला पाहून ते आश्चर्यचकितही झाले आहेत.

त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, तर काही नेटिझन्सनी पॅचअप झाला का, असा थेट प्रश्न केला आहे. अलीकडेच, सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करत तिचं आणि रोहमनच ब्रेकअप झाल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर मागील काही दिवसांपासून सुष्मिता तिच्या आणि ललित मोदीसोबतच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Thakare : बिग बॉस विजेता शिव ठाकरेने गुपचूप बांधली लग्नगाठ; 'तो' फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

SCROLL FOR NEXT