Actress Shivangi Verma mother has passed away Saam tv
मनोरंजन बातम्या

Actress Mother Death: प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर; हक्काचा माणूस गमावला

Actress Mother Death: लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले असून तिच्या टीमने सोशल मीडियावर ही दुःखद बातमी शेअर केली. काही काळ अभिनेत्री सोशल मिडियापासून दूर राहणार आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Mother Death: टीव्ही आणि ओटीटी विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी वर्मा सध्या अतिशय कठीण काळातून जात आहे. अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले असून ही दुःखद बातमी तिच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या घटनेनंतर मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून चाहते आणि कलाकारांकडून अभिनेत्रीला धीर दिला जात आहे.

‘भुतू’, ‘हमारी सिस्टर दीदी’ आणि ‘हसरतें ३’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली शिवांगी वर्मा आपल्या अभिनयामुळे विशेष लोकप्रिय ठरली होती. छोट्या पडद्यापासून ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत तिने स्वतःचे मजबूत स्थान निर्माण केले. मात्र आता तिच्या आयुष्यातील अत्यंत जवळची व्यक्ती हरवल्याने ती पूर्णपणे हादरली आहे.

शिवांगीच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवांगी सध्या सोशल मीडियावर सक्रिय नाही; कारण आईच्या निधनामुळे ती सध्या दुखात आहे. हा तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण काळ आहे आणि अशा वेळी त्यांना प्रेम, प्रार्थना आणि आधाराची नितांत गरज आहे. शिवांगी लवकरच परत येईल, परंतु तूर्तास तिला थोडा वेळ आणि एकांत (प्रायव्हसी) आवश्यक आहे. या कठीण काळात अभिनेत्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना कराव्यात.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्रीला धीर देणाऱ्या आणि तिच्या दिवंगत आईला श्रद्धांजली वाहणाऱ्या अनेकांनी कमेंट्स आल्या आहेत.काही चाहत्यांनी “देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो” अशा भावना व्यक्त केल्या, तर अनेकांनी शिवांगीला या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना केली. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनीही अभिनेत्रीच्या पाठीशी उभे राहत तिला मानसिक आधार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT