Shilpa Shetty Accident Saam TV
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात; डावा पाय झाला फ्रॅक्चर

रोहित शेट्टी यांने एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरती पोस्ट केला होता. यामध्ये शिल्पा शेट्टी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी खूप धिंगाणा घातलाना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा शुटींग दरम्यान अपघात झाला असून या अपघातामध्ये शिल्पा शेट्टीचा डावा पाय फ्रॅक्‍चर झाला आहे. मागिल अनेक दिवसांपासून रिएलिटी शो मध्ये जज म्हणून प्रेक्षकांसमोर येत शिल्पा शेट्टीने बॉलिवूड मध्ये पुन्हा प्रदार्पन करण्यास सुरुवात केली आहे.

एका दिवसापुर्वीच दिग्दर्शक रोहित शेट्टी यांने एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरती पोस्ट केला होता. यामध्ये शिल्पा शेट्टी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी खूप धिंगाणा केल्याचं दिसून आलं होतं.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता शिल्पा शेट्टीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत तिने स्व:ता याबाबतची माहिती दिली आहे. सोशल मीडियावरती माहिती देताना आपला पाय फॅक्चर झाल्याचं शिल्पाने सांगितलं आहे. शिवाय या अपघातामुळे आता शिल्पाला ६ आठवडे काम करता येणार नाहीये.

दरम्यान, या अपघाताबाबत शिल्पा शेट्टीने एक फोटो ट्विट केला असून या फोटोमध्ये ती एका व्हील चेअरवरती बसल्याचं दिसून येत आहे. तर तिच्या डाव्या पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे. शिवाय शिल्पा या फोटोमध्ये हसताना दिसून येतेय.

फोटो शेअर करताना शिल्पाने लिहंल आहे की, ‘वो कहते हैं न कि रोल, कैमरा अॅक्‍शन- ‘ब्रेक ए लेग’. मी त्या वाक्याला मी शब्दश: घेतलं असून ६ आठवडे आता काही करु शकणार नाही. तसंच मी लवकर बरी होऊन परत येईन तो पर्यंत दुआ में याद रखना.'

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळावर ३० कोटींचे कोकेन जप्त, DRI ची मोठी कारवाई

Shocking: ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून गोणीकत भरले, नंतर...

Crime: बॉयफ्रेंडच्या मदतीने आईने घेतला पोटच्या मुलाचा जीव, हातपाय बांधून अमानुष मारहाण, नंतर...

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT