Shagufta Ali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Breast Cancer: ज्येष्ठ अभिनेत्रीने स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे लपवले, कारण सांगत म्हणाल्या, 'काम मिळण्यासाठी...'

Actress Breast Cancer: अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांनी अनेक काळ त्यांचा आजारपण लपवला. आता एका मुलाखतीत त्यांनी आपला आजारपण का लपवला या मागचे कारण सांगितले.

Shruti Vilas Kadam

Actress Breast Cancer: बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल प्रथमच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. दिलीप कुमार, नूतन, गोविंदा, करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलेल्या शगुफ्ता यांनी ब्रेस्ट कॅन्सरशी लढा, आर्थिक संकट आणि करिअर टिकवण्यासाठी केलेला संघर्षाबद्दल भाष्य केले.

सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत शगुफ्ता अली यांनी सांगितले की, त्यांना तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. मात्र ही गोष्ट त्यांनी अनेक वर्षे कोणालाही सांगितली नाही. यामागील कारण सांगताना त्या म्हणाल्या की, जर इंडस्ट्रीला त्यांच्या आजाराची माहिती मिळाली असती, तर त्यांना काम मिळणे बंद झाले असते, अशी भीती त्यांच्या मनात होती.

त्या म्हणाल्या, 'मला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, याबद्दल कुणालाही सांगू नकोस. जर लोकांना ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळलं, तर तुला काम मिळणार नाही. त्या भीतीमुळेच मी शांत राहिले आणि कुणालाही याबद्दल सांगितलं नाही.' त्या काळात मनोरंजन क्षेत्रातील वातावरणही अशा गोष्टी स्वीकारण्यास तयार नव्हते.

आजारासोबतच शगुफ्ता अली यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. त्यांनी सांगितले की, घरखर्च आणि उपचारांचा खर्च चालवण्यासाठी त्यांना स्वतःचे दागिने आणि कार विकावी लागली. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी आपले घर विकले नाही. आजही गरज पडल्यास त्या ऑटो-रिक्षाने प्रवास करतात. या कठीण काळात अनेक कलाकारांनी त्यांना मदतीचा हात दिला. विशेषतः दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या सहकार्याबद्दल शगुफ्ता यांनी त्यांचे आभार मानले.

आर्थिक अडचणींवरून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. त्या म्हणाल्या, 'लोक विचारायचे की माझ्याकडे सेव्हिंग नव्हती का? अर्थातच होती. पण २०१७ पासून सुरू झालेल्या आजारपणात आणि घरखर्चात ती हळूहळू संपली. मी काही अंबानी, टाटा किंवा अदानी नाही. मी एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे आणि माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य होते. औषधोपचार, घरखर्च आणि रोजच्या गरजा या सगळ्या त्याच बचतीतून भागवाव्या लागल्या.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यात पीडित मुलीच्या मृतदेहासह रस्ता रोको; आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेची मागणी

Skin Problems Alert : चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसणारी 'ही' चिन्हं असू शकतात धोक्याची घंटा

High Cholesterol: नाश्त्यातील 'हे' ५ आवडीचे पदार्थ वाढवतात कोलेस्टेरॉल; हृदय निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

Farmer Loan : मोठी अपडेट! कर्जमुक्ती योजनेतील दोन लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

Famous Actress: 'मला आई व्हायचंय...'; 39 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबासमोर व्यक्त केली मनातील इच्छा

SCROLL FOR NEXT