Sai Tamhankar Get Trolled for her New Bold look  Instagram/ @saietamhankar
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar Trolled: फुलात फुल जाईचं आता काही खरं नाही सईचं; सोशल मीडियावर अभिनेत्री ड्रेसमुळे ट्रोल

Saie Tamhankar Bold Photos: सईला तिच्या नवीन फोटोवरून ट्रोल केले जात आहे.

Pooja Dange

Sai Tamhankar Get Trolled For Her New Dress: अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतेच सईने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. परंतु सईला तिच्या या नवीन फोटोवरून ट्रोल केले जात आहे.

नुकतेच फिल्मफेअर मराठी अवॉर्ड २०२२ हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी सईने ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारात गेली होती. सईने यावेळी हॉल्टर नेक बॅकलेस ब्लू अँड ब्लॅक रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेस एक मोठे फुल देखील होते.तिचा हा ड्रेस रिव्हिलिंग आहे. यामुळे आता सोशल मीडियावर सईला ट्रोल केले जात आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या सोशल मीडियावर तिच्या फिल्मफेअर अवॉर्ड मराठी पुरस्कार सोहळयात घातलेल्या ड्रेसचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर केल्यानंतर काहीच वेळाने नेटकऱ्यांनी सईला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

सईचे फोटो आणि आऊटफिट पाहून नेटकरी तिची तुलना उर्फीशी करत आहेत. सई उर्फीचे लाईट व्हर्जन आहे, उर्फीने साईच्या डोक्यावर हात ठेवला आहे, श्रीमंतांची उर्फी, उर्फीची कॉपी करू नको अशा कमेंट करत आहेत.

सई आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी मालिकेतून परीक्षक म्हणून भेटत असते. याचसह सई अनेक वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म देखील दिसते. सई झी ५ वरील इंडियन लॉकडाऊन या चित्रपटामध्ये दिसली होती. तसेची सईची बेरोजगार ही वेबसीरीज देखील लोकप्रिय झाली आहे. नेटजिओ या चॅनेलवर सई एक ट्रॅव्हलिंग शो देखील करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त | VIDEO

Constant Stomach Pain : सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार

Railway: आता जनरल डब्यात मिळणार लगेच सीट, प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Beed Crime : व्हिडिओ व्हायरल का केला?, जाब विचारणाऱ्या मित्राचेच बोटे छाटली; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT