sai tamhankar
sai tamhankar  facebook
मनोरंजन बातम्या

IIFA 2022 : अभिनेत्री सई ताम्हणकर ठरली IIFA पुरस्काराची मानकरी

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॅालिवूडमधील मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखला जणारा सोहळा म्हणजे 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' आयफा (IIFA). या पुरस्कार सोहळ्याची जसे प्रेक्षक वाट बघत असतात. तसेच कलाकार देखील या सोहळ्याची तेवढीच आतुरतेने वाट बघत असतात. IIFA २०२२ पुरस्कार सोहळा नुकताच अबू धाबीमध्ये पार पडला. तब्बल २ वर्षांनंतर झालेल्या या सोहळ्यामध्ये क्रिती सेनॉन, विकी कौशल (Vicky Kaushal) यांसारख्या अनेक कलाकारांनी बाजी मारली आहे. तसेच या सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai tamhankar) देखील पुरस्कार (Award) प्राप्त करून बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपले स्थान निर्माण केले आहे. ( Marathi actress sai tamhankar News )

हे देखील पाहा -

३ आणि ४ जून रोजी पार पडलेल्या IIFA२०२२ या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार सई ताम्हणकरला मिळाला आहे. हा पुरस्कार तिला 'मिमी' या चित्रपटासाठी मिळालेला आहे. सई ताम्हणकरला हा पुरस्कार अर्जुन रामपाल आणि जेनेलिया डिसूझा यांच्या हस्ते मिळाला आहे. या पुरस्कारासाठी तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले.

मला समजलं होतं की हा पुरस्कार माझा आहे...

साम टिव्हीशी चर्चा करताना सई ताम्हणकर म्हणाली, 'IIFA हा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. याचं मतदान जगभरातून होतं. मला यासाठी जगभरातून मतदान मिळाले याचा खूप आनंद आणि अभिमान आहे. जेव्हा तुमच्या कामाचं कौतुक होतं, तेव्हा तुम्हाला अजून छान काम करण्यासाठी हुरूप येतो म्हणून मी भयंकर खूश आहे'. पुढे ती सांगते , मला हा पुरस्कार अर्जुन रामपाल आणि जेनेलिया डिसूझा यांच्या हस्ते मिळाले. जेव्हा त्यांनी माझ्या नावाचा लिफाफा उघडला, तेव्हा ते पुटपुटले अरे हे खूप मोठं नाव आहे. तेव्हाच मला समजलं होतं मला हा पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान, सई ताम्हणकरने पुरस्कारासोबतचा एक फोटो सोशल मीडियाच्या तिच्या अकाउंटवर शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'स्वप्न आणि आकांक्षांनी भरलेला अभिनेत्यांसाठी पहिला पुरस्कार नेहमीच खास असतो, ज्या पात्रासाठी तुम्ही खूप मेहनत केली आहे, त्या पात्राला ओळखले जाणे आणि त्या पात्रासाठी एवढं प्रेम मिळणे ही एक चांगली भावना आहे. शामा नेहमीच माझ्यासाठी खूप प्रिय पात्र आहे. तिचा आत्मविश्वास आणि मैत्रीचं कौतुक केल्याबद्दल आयफा (IIFA)चे धन्यवाद'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT