Rinku Rajguru Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं नाटक; अनुभव शेअर करत म्हणाली...

Rinku Rajguru Share a Post About Marathi Natak : रिंकूने नाटक पाहतानाचा अविस्मरणीय क्षण अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rinku Rajguru News : मराठीत चित्रपटासोबतच मराठी नाटकालाही सिनेसृष्टीत अनन्यासाधारण महत्व आहे. मराठी प्रेक्षकांचे आणि नाटकाचे फारच घनिष्ट संबंध आहे. नुकतंच सैराट फेम आर्चीने पहिल्यांदा नाटक पाहिलं. नाटक पाहतानाचा अविस्मरणीय क्षण अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला ‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. यावेळी अभिनेत्री एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. तिने आयुष्यात पहिल्यांदाच नाटक पाहिलं आहे. नाटकासाठी कौतुकाची पोस्ट रिंकूने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच अभिनेत्री सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिच्या चित्रपटांविषयी माहिती देत असते.

नुकतच रिंकूने 'संगीत देवबाभळी' हे नाटक पाहिलं. रिंकूने पाहिलेले हे पहिलेच नाटक आहे. या नाटकाचा अनुभव रिंकूने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. रिंकूने नाट्यगृहातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रिंकू फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हणते, “माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक.अप्रतिम अनुभूती. सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे 'देवबाभळी'. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन !” सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. (Entertainment News)

रिंकू राजगुरूच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रिंकूने स्वतः नाटकात काम करावे अशी इच्छाही व्यक्त केली आहे. रिंकूच्या वर्कफंटबद्दल बोलायचे तर, रिंकूचा 'खिल्लार' हा बैलगाडा शर्यतीवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात रिंकूसोबत ललित प्रभाकर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी रिंकूने ललितसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Smartphone Care: पावसात फोन भिजला? घाबरू नका, 'या' टिप्सने तुम्ही फोन पुन्हा चालू करू शकता

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी सर्वात मोठी बातमी! राज्यातील तब्बल ५० लाख महिलांचा लाभ कायमचा बंद, कारणही आले समोर

SCROLL FOR NEXT