Ramya Krishnan: 'बाहुबली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री राम्या कृष्णन सध्या चर्चेत आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. त्यावेळी चित्रपटांच्या सेटवर महिला कलाकारांसाठी साध्या स्वच्छतागृहांचीही व्यवस्था नसायचा आणि त्यामुळे अभिनेत्रींची मोठी गैरसोय होत असे, असा खुलासा त्यांनी केला आहे. स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे महिला कलाकारांना चक्क बिसलेरीच्या बाटल्यांचा वापर करावा लागायचा, असे त्यांनी सांगितले.
राम्या कृष्णन यांनी नुकतीच 'रॉ टॉक्स विथ व्हीके' या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जुन्या काळातील चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रींच्या अडचणींबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, पूर्वी चित्रपटांच्या सेटवर महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय नसायची. त्यामुळे अनेकदा महिला कलाकारांना बिसलेरीच्या बाटल्यांमध्ये लघुशंका करावी लागायची. हे सांगावे की नाही, हे मला माहीत नाही; पण ती गोष्ट खरी आहे. त्या काळात सेटवर स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे आम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागायचा." आजच्या अभिनेत्री खूप नशीबवान आहेत, कारण त्यांना शूटिंगच्या ठिकाणी अनेक सुविधा मिळतात, असेही त्यांनी सांगितले.
या मुलाखतीदरम्यान राम्या कृष्णन यांना अभिनेत्रींच्या एकमेकींशी असलेल्या संबंधांबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी जुन्या काळातील अभिनेत्रींच्या वागण्याबद्दल आपले मत मांडले. त्या म्हणाल्या की, काही अभिनेत्री इतरांसमोर एकमेकींशी खूप प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीने वागायच्या. मात्र, त्यांच्या मनात वेगळ्याच भावना असायच्या. त्यामुळे पडद्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसणारे त्यांचे नाते आणि प्रत्यक्षातील संबंध यामध्ये फरक होता.
जुन्या काळात अभिनेत्रींच्या मनात एकमेकींबद्दल स्पर्धा आणि मत्सराची भावना असायची. मात्र, आता परिस्थिती बदलत असल्याचे राम्या कृष्णन यांना वाटते. आजच्या अभिनेत्री एकमेकींना मदत करतात आणि त्यांच्यात पूर्वीसारखी स्पर्धा किंवा मत्सर असेलच असे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.